CM Basavaraj Bommai-Siddaramaiah Meet at Belagav Sambra Airport
CM Basavaraj Bommai-Siddaramaiah Meet at Belagav Sambra Airport esakal
देश

VIDEO : टोकाचे विरोधक बेळगाव विमानतळावर आले आमनेसामने; बोम्मई-सिद्धरामय्यांच्या भेटीत काय घडलं?

Balkrishna Madhale

निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख अगदी जवळ आलीये. या निवडणुकीत मुख्य लढत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आज (बुधवार) विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्नाटकमध्ये अत्यंत भारलेल्या वातावरणात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) बेळगावच्या सांब्रा विमानतळावर (Sambra Airport) अचानक आमनेसामने आले.

आज बसवराज बोम्मई, सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे बेळगाव विमानतळावर पोहोचले असता, त्यांनी तिथं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अचानक भेट घेतली.

नुकतेच सिद्धरामय्या यांनी बोम्मई हे 'भ्रष्ट मुख्यमंत्री' असल्याचा आरोप केला होता. मात्र, आज जेव्हा दोन्ही नेते एकमेकांना पाहून पुढं सरसावले आणि त्यांनी विमानतळावर एकमेकांचं स्वागत करत हस्तांदोलन केलं. गेल्या आठवड्यात बोम्मई बेंगळुरूमध्ये एका खासगी कार्यक्रमात खर्गे यांना हात जोडून अभिवादन करताना दिसले होते. मात्र, या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT