Karnataka Election Survey esakal
देश

Karnataka Election Survey : निवडणुकीपूर्वी मोठा सर्व्हे समोर; जाणून घ्या कोणाचं बनतंय सरकार, भाजप की काँग्रेस?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचलीये. सर्वच पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत.

Balkrishna Madhale

कर्नाटकमधील 224 पैकी 222 जागांसाठी भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षानं तिसरी आणि शेवटची यादीही जाहीर केली आहे.

Karnataka Election Survey : कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचलीये. सर्वच पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. यामध्ये काहींना डावलं जात आहे, तर काहींना संधी दिली जात आहे. यामुळं तिकीट न मिळालेले नाराज नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.

राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत, त्यामुळं कोणत्याही पक्षाला सत्तेवर येण्यासाठी 123 जागा जिंकणं आवश्यक आहे. 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटक निवडणुकीसंदर्भात एक मोठा सर्व्हे समोर आलाय.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जनमत चाचण्यांच्या मेगा सर्व्हेत यावेळी काँग्रेसला (Congress) बंपर विजय मिळताना दिसत आहे. लोक सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 66-69 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 128-131 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणाबाबत बोलायचं झालं तर 65000 लोकांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलंय.

कर्नाटक मेगा सर्वेक्षण

  • भाजप-66-69

  • काँग्रेस-126-131

  • जेडीएस- 21-25

  • इतर - 0-2

कर्नाटकमधील 224 पैकी 222 जागांसाठी भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षानं तिसरी आणि शेवटची यादीही जाहीर केली आहे. शेवटच्या यादीत 10 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपनं 224 पैकी 222 उमेदवारांची घोषणा केली आहे. 11 एप्रिल रोजी पहिली यादी जाहीर करण्यात आली, त्यात 189 उमेदवार, दुसरी यादी 12 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली, त्यात 23 उमेदवार, तिसरी यादी 17 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली, त्यात 10 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT