DK Shivakumar esakal
देश

DK Shivakumar : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांवर लाच घेतल्याचा आरोप, आयोगाकडं तक्रार

बी-फॉर्म देण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांकडून लाच मागितल्याचा आरोप त्यांनी डीकेंवर केलाय.

Balkrishna Madhale

करंदलाजे ह्या राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीच्या निमंत्रक आहेत.

बेंगळुरू : केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे (Shobha Karandlaje) यांनी काँग्रेस उमेदवारांकडून लाच घेतल्याचा आरोप करत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडं (Election Commission) तक्रार केलीये.

बी-फॉर्म देण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांकडून लाच मागितल्याचा आरोप त्यांनी डीकेंवर केलाय. करंदलाजे ह्या राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीच्या निमंत्रक आहेत.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीनं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करून इच्छुकांकडून (Congress Candidate) पैसे घेतल्याचं शिवकुमारांनी स्वतः मान्य केल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केलाय. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांच्याकडं केलेल्या तक्रारीत करंदलाजे यांनी शिवकुमार, तसंच काँग्रेसच्या सर्व उमेदवारांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केलीये.

करंदलाजे तक्रारीत काय म्हणाल्या?

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल होती. शुक्रवारी रिटर्निंग अधिकाऱ्यांकडून सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना यांच्याकडं केलेल्या तक्रारीत करंदलाजे म्हणाले, 'काँग्रेस प्रदेशाध्यक्षानं उमेदवारांना तिकीट देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे मागितले आहेत.'

भाजपच्या मंत्र्यानं काँग्रेसच्या नेत्यावर, तसंच सर्व पक्षीय उमेदवारांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केलीये. भारतीय दंड संहिता आणि निवडणूक कायद्यातील तरतुदींनुसार ही लाचखोरी असून आदर्श आचारसंहितेचंही गंभीर उल्लंघन आहे, असं करंदलाजे यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT