Karnataka Elections 2023
Karnataka Elections 2023 
देश

Karnataka Elections 2023 : मतदानाला एक दिवस बाकी असतानाच भाजपचं मध्यरात्री ट्विट; राजकीय वर्तुळात चर्चा

धनश्री ओतारी

कर्नाटकातील निवडणूक प्रचार सोमवारी (8 मे) संध्याकाळी 5 वाजता संपला. मात्र, भाजप मध्यरात्रीसुद्धा सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. मतदानाला एक दिवस बाकी असतानाच भाजपनं केलेलं मध्यरात्रीचे ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. (Karnataka Elections 2023 BJP midnight tweet viral pm modi)

प्रचार थांबल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी काल रात्री १२.२१ वाजता कर्नाटकच्या जनतेसाठी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. भाजपच्या ट्विटर हँडलवर पंतप्रधानांचा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भाजपला मत देण्याचे आवाहन केले आहे.

'कर्नाटकला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी दुहेरी इंजिन सरकारची गरज आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'तुमची स्वप्ने, ही माझी स्वप्ने आहे ती आपण आम्ही मिळून पूर्ण करू'. असं मोदींनी व्हि़डीओमध्ये म्हटले आहे.

सध्या कर्नाटकातील जनतेने डबल इंजिन सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील कारभार पाहिला आहे. भाजप सरकारची निर्णायक, केंद्रीत आणि भविष्यवादी धोरणे कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

कोरोनासारख्या महामारीनंतरही कर्नाटकातील भाजप सरकारच्या कार्यकाळात विदेशी गुंतवणूक आणि एफडी वार्षिक 90 हजार कोटी रुपयांवर आली होती, त्याचवेळी मागील सरकारच्या काळात हाच आकडा केवळ 30 हजार कोटी रुपयांच्या आसपास होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT