Karnataka High Court esakal
देश

लाउडस्पीकरवरील 'अजान' कोणाच्याही मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करत नाही : High Court

'अजान ही मुस्लिमांची अत्यावश्यक धार्मिक प्रथा आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'अजान ही मुस्लिमांची अत्यावश्यक धार्मिक प्रथा आहे.'

बंगळुरु : लाउडस्पीकरवर 'अजान' दिल्याने इतर धर्मातील लोकांच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत नाही, असं कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) म्हटलंय. मशिदींना लाउडस्पीकरवर (Loudspeaker) अजान देण्यास मनाई करणारा आदेश पारित करण्यास न्यायालयानं नकार दिलाय.

लाउडस्पीकरशी संबंधित 'ध्वनी प्रदूषण नियम' लागू करण्याचे आणि अनुपालन अहवाल दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिलेत. प्रभारी मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं बंगळुरुचे (Bangalore) रहिवासी मंजुनाथ एस. हलावर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेत म्हटलं होतं की, 'अजान ही मुस्लिमांची अत्यावश्यक धार्मिक प्रथा आहे. मात्र, अजानचा आवाज इतर धर्माचं पालन करणाऱ्यांना त्रास देतो.'

न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 आणि 26 मध्ये सहिष्णुतेच्या तत्त्वाला मूर्त रूप दिलंय, जे भारतीय सभ्यतेचं वैशिष्ट्य आहे. घटनेचं कलम 25 (1) लोकांना त्यांच्या धर्माचा मुक्तपणे प्रचार आणि प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करतं. मात्र, हा पूर्ण अधिकार नाही, असं न्यायालयानं म्हटलंय. सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या बाबतीत भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 च्या इतर तरतुदींनुसार ते निर्बंधांच्या अधीन आहे. अजानचा आवाज इतर धर्माच्या लोकांना मिळणाऱ्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करतो, हा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असंही उच्च न्यायालयानं नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT