Puneeth Rajkumar  esakal
देश

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचं Heart Attack नं निधन

सकाळ डिजिटल टीम

कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमारचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

बंगळूरु (कर्नाटक) : कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार Superstar Puneeth Rajkumar याचं (वय 46) शुक्रवारी (ता. 29) हृदयविकाराच्या झटक्यानं बंगळूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलीय. प्रसिद्ध अभिनेते दिवंगत डॉ. राजकुमार यांचे ते तृतीय सुपुत्र होते. शुक्रवारी सकाळी जिममध्ये असताना पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लागलीच बंगळूर येथील विक्रम रुग्णालयात (Vikram Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.

पुनीत राजकुमार यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. बालकलाकार म्हणून त्यांनी अनेक कन्नड चित्रपटात काम केले आहे. राज्यभरात त्यांचे असंख्य चाहते असून त्यांच्या अभिनय शैलीमुळे पुनीत राजकुमार यांना 'पावर स्टार' ही पदवी दिली होती. सुमारे सात महिन्यापूर्वी पुनीत आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बेळगावात आले होते. दरम्यान, पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी दुखवटा व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT