Karnataka Politics esakal
देश

Karnataka Politics : 'लवकरच सरकार कोसळणार, 45 आमदार आमच्या संपर्कात'; भाजप नेत्याच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये खळबळ

येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास संतोषच जबाबदार होते.

सकाळ डिजिटल टीम

'ऑपरेशन कमळ’ची आम्हाला नेहमीच काळजी असते. पण आता तसे वातावरण नाही.'

बंगळूर : कॉंग्रेसचे ४५ आमदार (Congress MLA) आपल्या संपर्कात असल्याचे भाजप राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. राज्यातील कॉंग्रेस सरकार (Congress Government) कोसळेल, अशा भ्रमात भाजप असल्याची टीका करून संतोष यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याच्या प्रतिक्रिया कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उपरोधिकपणे सांगितले की, संतोष (B. L. Santosh) यांनी सर्व काँग्रेस आमदारांशी संपर्क साधला, तर आम्हाला आनंदच होईल. अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा म्हणाले की, संतोष यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पराभवामुळे निराश होऊन हे विधान केले आहे.

राज्य सरकार पडेल या भ्रमात भाजप असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. ‘ऑपरेशन कमळ’ची आम्हाला नेहमीच काळजी असते. पण आता तसे वातावरण नसल्याचे ते म्हणाले.

उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनीही संतोष यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेऊन भाजपातील नाराज आमदारांना पक्षात टिकवून ठेवण्याचा हा त्यांचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले की, काँग्रेसच्या नगरपरिषद सदस्यांच्या संपर्कातही संतोष नाहीत. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास संतोषच जबाबदार होते.

‘ऑपरेशन कमळ’साठी पैसा कुठून येतो?

मंत्री प्रियांक खर्गे म्हणाले, ‘‘ऑपरेशन कमळ’साठी पैसा कुठून येतोय? याचे उत्तर संतोष यांनी द्यावे. तुम्हाला एक दिवस नाही, महिनाभर देऊ. ४५ नव्हे तर चार आमदार फोडून दाखवा. येडियुराप्पा यांना संतोष यांनीच तिकीट दिले नाही. त्याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT