Holi 2024 esakal
देश

Holi 2024 : काशीतल्या 'या' भागात चितेच्या राखेने खेळली जाते अनोखी होळी; काय आहे परंपरा?

Masane Ki Holi : आज देशभरात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. होळीचे आपण आजवर अनेक रंग बघितले असतील. मोठ्या शहरांमध्ये रंग-गुलालाने होळी साजरी केली जाते. बरसाणा येथे लाडू आणि लाठमार होळी साजरी केली जाते.

संतोष कानडे

Masane Ki Holi : आज देशभरात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. होळीचे आपण आजवर अनेक रंग बघितले असतील. मोठ्या शहरांमध्ये रंग-गुलालाने होळी साजरी केली जाते. बरसाणा येथे लाडू आणि लाठमार होळी साजरी केली जाते.

गोकुळामध्ये काठीने तर वृंदावनात फुलांची होळी साजरी केली जाते. याशिवाय मोक्ष नगरी काशीमध्ये एक अद्भूत आणि अकल्पनीय होळी साजरी केली जाते. हे शिवाचे नगर असल्याने वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर महादेवाचे भक्त स्मशानभूमीत मृतदेहांच्या राखेने होळी खेळतात.

बाबा विश्वनाथांची पालखी निघते तेव्हाच लोक या सोहळ्यात रंग खेळतात. असं म्हटलं जातं की, भगवान शिव माता पार्वतीची गौना पुजा करुन दरबारात परततात. दुसऱ्या दिवशी महादेव आपल्या स्वरुपात स्मानभूमीत येतात आणि घाटावरील जळत्या चितेच्या राखनेने होळी खेळतात. या परंपरेतून हा उत्सव साजरा केला जातो.

यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, हर हर महादेवच्या जयघोषात, भांग, थंडाईसह लोक एकमेकांना भस्म लावतात. हे एक अद्भूत दृष्य असतं. लोकांची आस्था आहे की, स्वतः स्मशाननाथ भक्तांसोबत होळी खेळतात.

काशी नगरी आणि भगवान शिवाचं वेगळंच नातं आहे. महादेव केवळ आपल्या कुटुंबासोबत राहात नसून ते इथल्या प्रत्येक लोकांसोबत राहतात आणि प्रत्येक सणामध्ये सहभागी होतात. फाल्गुनात भक्तांसोबत होळी खेळण्याची परंपरा आजही कायम आहे. यादिशीव काशीतील लोक डमरुच्या घोषात हर हर महादेवाच्या जयघोषात एक-दुसऱ्याला भस्म लावतात.

काशी हे एकमेव अशी नगरी आहे, जिथे मनुष्याचा मृत्यूला पवित्र समजलं जातं. काशीतील मणिकर्णिका घाटावर भगवान शिवाने मोक्ष प्रदान करण्याची शपथ घेतली होती, असं मानलं जातं.

रंगभरी एकादशीच्या दिवशी महादेवाने देवी पार्वतीचा गौना पुजा केल्यानंतर भक्त आणि देवादिकांसोबत होळी खेळतात. परंतु या उत्सवात भूत-प्रेत, पिशाच्च आदी जीवजंतू त्यांच्यासोबत खेळू शकत नाहीत. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी ते मणिकर्णिका तीर्थावर स्नान करण्यासाठी येतात आणि आपल्या गणांसोबत चितेच्या राखेने होळी खेळतात. आजही ही परंपरा कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver Alert: कर्जमाफी की सिबिलवर डाग? ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेतील OTS नोंदीमुळे ५६ लाख शेतकऱ्यांच्या पतक्षमतेवर संकट

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

School Chicken Biryani: शाळकरी मुलांना मिळणार चवदार चिकन बिर्याणी! तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये आज पुन्हा पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT