खरं तर हे आहे की दोघांनाही लोकांबद्दल काहीही वाटत नाही. दोघेही नागपूरवाल्यांचे Arvind Now आणि Yogi Now आहात असं काँग्रेसने म्हटलं.
नवी दिल्ली - संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी भाषण केले. या भाषणानंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी हे भाषण केल्याचं विरोधकांनी म्हटलंय. दरम्यान, आता दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यामध्ये या भाषणावरून वाद सुरु झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी एकमेकांना ट्विटरवरून सुनावलं आहे.
पंतप्रधान मोदींनी संसदेत बोलताना म्हटलं की, दिल्ली सरकारने कोरोनाच्या काळात लोकांना दिल्ली सोडून जाण्यास सांगितलं होतं. मोदींनी असंच वक्तव्य महाराष्ट्राबद्दलही केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींचे वक्तव्य खोटे असल्याचे म्हटले. त्यानतंर योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट करून केजरीवालांवर निशाणा साधला. यालाही केजरीवाल यांनी उत्तर दिलं. आता या दोघांच्या वादात छत्तीसगढ काँग्रेसने उडी घेतली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींचे वक्तव्य खोटे असल्याचं ट्विटरवर म्हटलं. त्यांनी म्हटलं की, मोदीजींचे हे वक्तव्य सरळसरळ खोटं आहे. देशाला आशा आहे की, ज्या लोकांना कोरोनाच्या काळात त्रास सहण करावा लागला. आपल्या जीवलगांना गमावलं, त्यांच्याबद्दल पंतप्रधानांनी संवेदनशील असायला हवं. लोकांच्या वेदनेवरून राजकारण करणं पंतप्रधानांना शोभत नाही असंही केजरीवाल म्हणाले.
केजरीवालांच्या ट्विटला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, केजरीवाल यांचं पंतप्रधान मोदींबाबतचं विधान निंदनीय आहे. केजरीवाल यांनी देशाची माफी मागायली हवी. खोटेपणावरून त्यांनी तुलसीदासांच्या दोन ओळीही शेअर केल्या आहेत. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये योगींनी म्हटलं की, 'केजरीवाल ऐका, जेव्हा मानवता कोरोनाने त्रासली होती तेव्हा उत्तर प्रदेशच्या कामगारांना दिल्ली सोडण्यास भाग पाडलंत. लहान मुलं, महिलांना अर्ध्या रात्री उत्तर प्रदेशच्या सीमेवर सोडलंत. लोकशाहीच्या विरोधात आणि अमानवी असं काम तुमच्या सरकारने केलं. तुम्हाला मानवताद्रोही म्हणावं की..'
योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटला पुन्हा केजरीवाल यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, तुम्ही तर बोलूच नका. उत्तर प्रदेशात लोकांचे मृतदेह नदीत तरंगत होते आणि कोट्यवधी रुपये खर्चून टाइम मॅगझीनमध्ये खोटं कौतुक करणाऱ्या जाहिरात देत होतात. तुमच्यासारखा निर्दयी आणि क्रूर शासक मी पाहिला नाही.
योगी आणि केजरीवाल यांच्या ट्विटरव वॉरमध्ये काँग्रेसनेसुद्धा उडी घेतली आहे. छत्तीसगढ काँग्रेसकडून ट्विटरवर लिहिण्यात आलं की, सुनो योगी-केजरीवाल, दोघेही ही नुरा कुस्ती खेळून देशाला मूर्ख बनवू नका. खरं तर हे आहे की दोघांनाही लोकांबद्दल काहीही वाटत नाही. दोघेही नागपूरवाल्यांचे Arvind Now आणि Yogi Now आहात असं काँग्रेसने म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.