Kerala student suicide 
देश

जीवघेणं ऑनलाइन शिक्षण; क्लास चुकल्याने विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य

सकाळ वृत्तसेवा

मल्लापुरम, ता. 04 : कोरोना व्हायरसने जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याकाळात शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन क्लासेसही सुरू केले. मात्र अशाच एका ऑनलाइन क्लासला उपस्थित राहता न आल्यानं नववीच्या विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन क्लास अॅटेंड करता न आल्यानं विद्यार्थीनी निराश होती अशी माहिती समजते.

विद्यार्थीनीच्या वडिलांनी सांगितले की, घरी एक टीव्ही आहे पण तो सुरू नाही. माझ्या मुलीने तो दुरुस्त करायला हवा असं सांगितलं होतं पण मला ते जमलं नाही. तिने आत्महत्येचं पाऊल का उचललं हे मला माहिती नाही. मी तिला म्हटलं होतं की मित्राच्या घरी जाऊन ऑनलाइन क्लास घेऊ शकतेस. 

आत्महत्या केलेल्या मुलीचे वडील मोलमजुरी करतात. तर काही आठवड्यांपूर्वीच मुलीच्या आईने दुसऱ्या अपत्याला जन्म दिला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे. मुलीला याची चिंता होती की पुढचं शिक्षण ती करू शकेल की नाही. केरळच्या शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल जिल्ह्य़ातील शिक्षण अधिकाऱ्यांकडून मागितला आहे. 

केरळमध्ये 1 जूनपासून ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरू केलं आहे. हे ऑनलाइन क्लास व्हिक्टर्स चॅनेलवरून प्रसारीत केले जातात. मात्र राज्यातील अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी अशा टीव्ही उपकरणांपासून वंचित आहेत. सरकार प्रायोजकांच्या मदतीने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात येणाऱ्या अडचणींबाबत एक पत्र तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं. विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लाससाठी आवश्यक असलेल्या सुविधा पुरवण्याबाबतही त्यांनी लिहिलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT