kerala man carries ailing father on shoulders after police stop vehicle over lockdown 
देश

आजारी वडिलांना खांद्यावर घेतलं अन् निघाला चालत...

वृत्तसंस्था

कोल्लम (केरळ): पोलिसांनी रिक्षामधून खाली उतरवल्यानंतर आजारी वडिलांना खांद्यावर उचलून घेत चालत निघाला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यामधील पुनारुल येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कलाथूफूझा येथे राहणाऱ्या या ६५ वर्षीय व्यक्तीला पुनारुल तालुका रुग्णालयामधून सोडण्यात आले होते. वडिलांना घेऊन त्यांचा मुलगा रिक्षाने घरी जात होता. मात्र, घरापासून एक किलोमीटर अंतरावर पोलिसांनी त्यांची रिक्षा अडवली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील सर्व कागदपत्रे पोलिसांना दाखवली. मात्र, पोलिसांनी लॉकडाऊनचे कारण पुढे करत  रिक्षा घेऊन पुढे जाऊ दिली नाही. यानंतर मुलाने आजारी वडिलांना खांद्यावर उचलून घेतले आणि चालत निघाला. वडिलांना खांद्यावर घेऊन एक किलोमीटर अंतर पार केले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलाने आपल्या वयस्कर वडिलांना उचलून घेतल्याचे दिसत आहे. तर या दोघांबरोबर एक वयस्कर महिला रुग्णालयाशी संबंधित कागदपत्र आणि इतर गोष्टी घेऊन चालताना दिसत आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीका होऊ लागली. केरळमधील मानवाधिकार आयोगाने याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यासंदर्भात हलचाली सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे रिक्षा थांबवण्यात आली तेव्हा त्यामध्ये रुग्ण नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT