Kerala Plane Crash 
देश

Kerala Plane Crash : वैमानिकाने पहिल्यांदा टाळले होते लँडिंग

सुशांत जाधव

केरळमधील विमान अपघाताचे नमकं कारण काय? हे अदयाप समोर आलेलं नाही. ब्लॅक बॉक्स उपकरणाच्या माध्यमातून यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकते. दरम्यान  हवाई वाहतूक नियंत्रण कक्षानुसार लँडींगचा दुसरा प्रयत्न झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. flightradar24 ने यासंदर्भातील माहिती दिली आहे. वैमानिकाने सुरुवातीला लँडिग टाळले. अपघात झाला त्यावेळी विमानाचे दुसरे लँडिग होते.

धावपट्टीवर पाणी असल्यामुळे लँडिंग करणे धोकादायक असल्याचे लक्षात घेऊनच वैमानिकाने हा निर्णय घेतला असावा. दुसऱ्या प्रयत्नात लँडिंग झालेले विमान धावपट्टीवरुन घसरले अन् थेट दिरीत जाऊन कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले. मृतांमध्ये दोन पायलटसह बहुंताश हे विमानाच्या समोरच्या बाजूला बसलेले होते. विमानाने पेट न घेतल्यामुळे उर्वरित प्रवाशांचा धोका टळला. केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटवरुन या अपघाताची माहिती दिली होती. तुफान पाऊस असल्यामुळे धावपट्टीवर साचलेल्या पाण्यामुळे विमान ट्रॅकवरुन घसरुन हा अपघात झाला. विमान 35 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिकांसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे.  

अपघाताच्या ठिकाणी विमानातील ब्लॅक बॉक्स हे उपकरण सापडले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून अपघातासंदर्भात आणखी कोणती माहिती समोर येणार हे पाहावे लागेल. देशातील सर्वाधिक धोकादायक धावपट्टीपैकी कोझिकोडेची धावपट्टी एक आहे. हा विमान अपघात ज्या धावपट्टीवर घडला त्या धावपट्टीला टेबल टॉप रनवे असे संबोधले जाते. पठारावरील मोकळ्या जागेत असलेल्या  धावपट्टीचा आधार घेत विमान जमिनीवर उतरणे मोठे आव्हानात्मक असते. यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते. या अपघातानंतर आता याबबात काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT