National Investigation Agency ED esakal
देश

देशभरात PFI च्या अनेक ठिकाणांवर NIA, ED ची मोठी कारवाई; 100 हून अधिक लोकांना अटक

NIA ची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

सकाळ डिजिटल टीम

NIA ची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

तिरुवनंतपुरम : राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयानं (ED) केरळ, तामिळनाडू (Tamil Nadu), कर्नाटकसह 10 राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front of India PFI) अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. एनआयए आणि ईडीनं या राज्यांमधील पीएफआयच्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेतली आहे. या कारवाईत तपास यंत्रणेनं आणखी 100 जणांना अटक केली आहे.

NIA ची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे, ज्याअंतर्गत पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. दहशतवादाला निधी पुरवणं, प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणं आणि लोकांना बंदी घातलेल्या संघटनांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथीय बनवणं यात गुंतलेल्या व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयांवर तपास यंत्रणांकडून शोध घेण्यात येत आहे.

एनआयएनं तामिळनाडूतील कोईम्बतूर, कुड्डालोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेंकासीसह अनेक ठिकाणी पीएफआय नेत्यांच्या घरांची झडती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई PFI स्टेट हेड ऑफिस पुरसावक्कम इथंही झडती घेण्यात आली आहे. NIA आणि ED नं PFI चे अध्यक्ष OMA सलाम यांच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी इथं मध्यरात्रीपासून छापे टाकले आहेत. एनआयए, ईडी आणि राज्य पोलिसांनी 10 राज्यांमध्ये पीएफआयच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Rule: फ्रँचायझींकडून हरकती अन् आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये बदल; वादग्रस्त नियम हटवणार? BCCI च्या Emailमध्ये नेमकं काय?

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT