Keshav Prasad sons road accident Keshav Prasad sons road accident
देश

UP : उपमुख्यमंत्र्यांचा मुलाचा अपघात; कारने ट्रॅक्टरला दिली धडक

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनलेले केशव प्रसाद मौर्य यांचा मुलगा योगेश कुमार मौर्य यांच्या कारला जालौनमध्ये अपघात झाला. जालौन जिल्ह्यातील काल्पी कोतवाली भागातील आलमपूर बायपासजवळ हा अपघात झाला. हा अपघात शनिवारी (ता. २६) दुपारी घडला. (Keshav Prasad sons road accident)

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी मध्य प्रदेशातील पीतांबरा मंदिरात दर्शनासाठी निघालेला उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा मुलगा योगेश कुमार मौर्य यांच्या कारची ट्रॅक्टरला धडक (Road Accident) बसली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे तर ज्या ट्रॅक्टरसह अपघात झाला त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात केशव यांचा मुलगा योगेश थोडक्यात बचावले. यानंतर त्यांना दुसऱ्या कारमध्ये पाठवण्यात आले. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जालौन जिल्ह्यात योगेश मौर्य यांच्या फॉर्च्युनर कारचा ट्रॅक्टरसोबत अपघात (Road Accident) झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT