Khalistani Flag Sakal
देश

Khalistani Flag: हिमाचलमध्ये सीमाबंदी; पोलिस हायअलर्टवर

काल हिमाचलप्रदेशमधील विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे लावण्यात आले होते.

दत्ता लवांडे

शिमला : काल हिमाचलप्रदेशमधील विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे लावण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी या घटनेवर कारवाई करत राज्याl सीमेबंदी केली आहे. त्यानंतर राज्यातील पोलिस हाय अलर्टवर असल्याची माहिती आहे.

(Khalistani Flag On Himachal Assembly Gate)

काल पहाटेच्या दरम्यान धर्मशाळा येथे असलेल्या तपोवनमधील विधानसभेच्या गेटवर हे झेंडे लावण्यात आले होते. त्या झेंड्यावर खलिस्तान असं नाव लिहीलेलं पाहायला मिळालं होतं. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत झेंडे हटवून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात आयपीसी सेक्शन १५३ अ, १५३ ब आणि शांतता भंग केल्याच्या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांची चौकशी सुरु केली होती.

दरम्यान सिख फॉर जस्टिसचे (SFJ) प्रमुख गुरुपतवंत सिंग पन्नू यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून भिंद्रनवाला आणि खलिस्तानचा ध्वज शिमल्यात फडकवला जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर त्याला या घटनेचा मुख्य गुन्हेगार ठरवलं आहे. हिमाचल पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास सुरू केला असून एसपींनी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांसाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच त्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांना आदेश दिले असून बॉम्बशोधक आणि निकामी करण्याच्या पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. तसेच राज्यातील विविध भागांत जसे धरणे, रेल्वे स्टेशन, बसस्टॅण्ड आणि सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी हायअलर्ट जारी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सार्वजनिक ठिकाणे, बॅंका आणि सरकारी इमारतींच्या सुरक्षा रक्षकांना आदेश दिले असून काही आक्षेपार्ह आढळल्यास पोलिसांना कळवण्याच्या सूचना दिल्या आहे. तसेच पंजाबमधील SFJ या संघटनेने हे कृत्य केल्याचा दावा एसपी कुशल शर्मा यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT