देश

ओमिक्रॉन आणि लॉकडाऊन; किरण मुझुमदार-शॉ यांनी दिला महत्त्वाचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाचं सावट अजूनही गडद आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या आगमनामुळे तिसऱ्या लाटेची भीती आणखी वाढली आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता कोरोनाचे निर्बंध ठिकठिकाणी कडक करण्यात येत आहेत. याबाबतच आता ‘बायोकॉन’च्या संस्थापक-अध्यक्ष किरण मुझुमदार-शॉ (Kiran Mazumdar Shaw) यांनी आज ओमिक्रॉन आणि कोरोना संसर्गाबाबत महत्त्वाची विधाने केली आहेत.

किरण मुझुमदार शॉ यांनी म्हटलंय की, ओमिक्रॉन डेल्टा पेक्षा लक्षणीयरीत्या जास्त संसर्गजन्य आहे. परंतु, लसीकरण केलेल्या लोकांसाठी तो लक्षणीयरीत्या कमी गंभीर आहे. लसीकरण न झालेल्या लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करूया जेणेकरुन बाकीच्यांना कडक लॉकडाउन नियमांमध्ये अडकावं लागणार नाही. पुढे त्यांनी म्हटलंयय की, लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल होण्यापासून संरक्षण मिळते. परंतु, बूस्टर डोसमुळे 9 महिन्यांनंतर आणखी संरक्षण मिळते.

कोण आहेत किरण मुझुमदार शॉ?

किरण मुझुमदार शॉ या उद्योजिका आहेत. त्यांनी जागतिक जैवऔषध निर्मिती क्षेत्रात देशाचे नाव उंचावले आहे. यापूर्वी त्यांची 'मेडिसन मेकर पॉवर लिस्ट २०२०' मध्ये सहाव्यांदा निवड करण्यात आली आहे. त्यांनी नवसंशोधनातून तयार केलेल्या औषधामुळे अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत. बंगळूरमध्ये जागा भाड्याने घेऊन अवघ्या दोन सहकाऱ्यांसह जैवउत्प्रेरकांच्या (बायो एन्झाईम्स) कामाला त्यांनी सुरुवात केली. भांडवल होते अवघे ५०० डॉलर! ध्येयाने प्रेरित झालेल्या किरण यांनी पुढे अनेक अडचणींवर मात करून कंपनीचा पाया मजबूत करण्याबरोबरच तिला प्रगतीच्या मार्गावर नेऊन ठेवले. आज पाच अब्ज डॉलरची ही कंपनी १२० देशांत पंख पसरून आहे. सामाजिक कर्तव्य जपण्याचे भान त्यांनी ठेवले आणि त्यातूनच बायोकॉन फाउंडेशनची स्थापना केली. दुर्बल घटकांना आरोग्यसेवा देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय. २०१४ मध्ये शेअर बाजारात नोंदणी झालेल्या ‘बायोकॉन’ने पहिल्याच दिवशी एक अब्ज डॉलरचा टप्पा गाठला आणि साऱ्यांचेच लक्ष वेधले. आज ही कंपनी अनेक पटींनी वाढत जाऊन आशियातील सर्वांत मोठी जैवऔषधी कंपनी ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT