Farmers Protest
Farmers Protest 
देश

कृषी कायद्याविरोधात 26 मे रोजी काळा दिवस

सूरज यादव

संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आंदोलनाला देशातील 12 विरोधी पक्षांकडून पाठिंबा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली - कृषी कायद्याविरोधात (New farmer elaw) शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरुच आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत अशा मागणीचं पत्र 12 मे रोजी संयुक्त किसान मोर्चाने लिहिलं होतं. त्यानंतर आता देशभरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे. 26 मे रोजी पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करण्यात येईल आणि काळा दिवस साजरा करू असं भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी म्हटलं आहे. काळा दिवस कसा साजरा करण्यात येईल हेसुद्धा यावेळी सांगण्यात आलं आहे. किसान युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी या दिवशी घरांवर, वाहनांवर, दुकानांवर काळे झेंडे किंवा काळे कापड फडकावतील. (Kisan union 26 may black day against farmers law)

गेल्या 6 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्राने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी केली होती. तर संयुक्त किसान मोर्चाने आता थेट देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आंदोलनाला देशातील 12 विरोधी पक्षांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संयुक्त किसान मोर्चाने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने जारी केलेल्या पत्रकावर माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव, शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, एम के स्टॅलिन, हेमंत सोरेन, तेजस्वी यादव, डी राजा, सीताराम येचुरी यांनी स्वाक्षरी केली आहे.

देशातील 12 प्रमुख विरोधी पक्षांकडून जारी केलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, आम्ही12 मे रोजी पंतप्रधानांना संयुक्तपणे एक पत्र लिहिलं होतं. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी कृषी कायदे रद्द करा. त्यामुळे आंदोलन मागे घेतलं जाईल आणि शेतकरी पुन्हा शेती करण्यासाठी परत जातील. आम्ही कृषी कायदे रद्द कऱण्यासाठी आणि स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT