देश

अर्थव्यवस्था अजूनही संकटात: डॉ. मनमोहनसिंग

वृत्तसंस्था

कोची : अर्थव्यवस्था संकटातून सावरली असल्याच्या भ्रमात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने राहू नये, असा सल्ला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शनिवारी दिला. मूडीज या पतमानांकन संस्थेने भारताच्या पतमानांकनात सुधारणा केल्याच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सिंग यांनी हा सल्ला दिला.

मूडीजच्या पतमानांकनाबद्दल बोलताना डॉ. सिंग म्हणाले, ""मूडीजने भारताच्या पतमानांकनात केलेल्या सुधारणेबद्दल मला आनंद आहे. मात्र, अर्थव्यवस्था संकटातून सावरली असल्याच्या भ्रमात सरकारने राहू नये. अर्थव्यवस्थेला ठोस आणि योग्य दिशा देण्याची गरज आहे. सरकारने आधी म्हटल्याप्रमाणे विकासदर 8 ते 10 टक्‍क्‍यांवर नेण्याची आवश्‍यकता आहे. कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढू लागले असून, यातून वित्तीय शिस्त बिघडणार आहे. सध्या कच्च्या तेलाचा भाव प्रतिबॅरल 62 ते 64 डॉलर आहे. तो काही महिन्यांपूर्वी 40 ते 45 डॉलर होता. यामुळे सरकारवर आर्थिक ताण पडू शकतो. याचाच परिणाम म्हणून वित्तीय चौकटीला फटका बसण्याची शक्‍यता आहे.''

"वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या अनेक बैठका झाल्या असून, नुकत्याच झालेल्या बैठकीत 211 वस्तूंवरील कर कमी करण्यात आले. वारंवार बदलणारे निर्णय पाहता जीएसटीच्या अंमलबजावणीत घाई झाली आणि नोकरशाहीलाही पुरेशी तयारी करण्यास वेळ मिळाला नाही,'' असे डॉ. सिंग यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT