Krantisinh Nana Patil Esakal
देश

Krantisinh Nana Patil : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मुखातून संसदेत पहिल्यांदा मराठी गर्जली!

नानांच्या मूखातून मराठी भाषा ऐकूण ते संसदेचे सभागृहही धन्य झाले असेल

सकाळ डिजिटल टीम

भारतीय स्वातंत्र्यलढयामधील एक झुंझार नेते म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडे पाहिले जाते. प्रामुख्याने सातारा, सांगली भागात त्यांनी स्वातंत्र्याची एक मोठी चळवळ उभी केली होती. ब्रिटीश सरकार विरोधार गावागावातील तरूणांना हाताशी धरून प्रतिसरकार उभे केले. प्रतिसरकारच्या माध्यमातून वेळोवेळी ब्रिटीश सरकारला पळवून लावले. त्यांच्या रेल्वे लुटल्या. अशा या लढवय्या नेत्याचा आज स्मृतीदीन आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात खास गोष्टी.

नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.

ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी १९४२ च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि.  माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड आणि कॅप्टन आकाराम पवार होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.

स्वातंत्र्यानंतर राबणाऱ्या कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष सुरुच ठेवला. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्न सोडवता येतील, असे त्यांना वाटले. मात्र, त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते कम्युनिस्ट राहिले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही सहभाग घेतला होता शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष च्या माध्यमातून नाना पाटील यांचं कार्य स्वातंत्र्य उत्तर काळात राहिले. 1957 मध्ये झालेल्या उत्तर सातारा मतदारसंघातुन लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1967 मध्ये ते बीड या ठिकाणाहून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून हे खासदार मधून निवडून आले होते.

त्या काळात संसदेत हिंदी भाषेत सर्व कामकाज चालायचे. संसदेत भाषाही हिंदी बोलली जायची. जेव्हा खासदारकीची शपथ घेऊन नाना भाषणाला उभे राहीले तेव्हा त्यांच्या तोंडून मराठी उच्चार बाहेर पडले. संसदेमध्ये मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार ठरले. नानांच्या मूखातून मराठी भाषा ऐकूण ते संसदेचे सभागृहही धन्य झाले असेल.

माजी खासदारावर जेव्हा बस ड्रायव्हर खेकसतो...

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या साधेपणाचे अनेक किस्से सांगितले जातात. एकदा ते आपल्या मुलीच्या सासरी हनमंतवडवे या गावाला एसटीने येत होते. त्यांच्या सोबत पत्र्याची पेटी होती. हनमंतवडवेला आल्यावर पेटी घेऊन उतरताना अण्णांना थोडा उशीर झाला, म्हणून एसटीचा वाहक त्यांच्यावर खेकसला, "म्हाताऱ्या, गाव जवळ आल्यावर पुढे यायला येत न्हाय का?" त्या तरुण वाहकाने त्यांना ओळखले नव्हते. त्यावर माजी खासदार असलेला हा लोकनेता त्या वाहकाला काहीही बोलला नाही. त्याने फक्त स्मितहास्य केले आणि ते एसटीतून उतरले.

अशा या क्रांतीसिंहाचा मृत्यू 6 डिसेंबर 1976 रोजी वाळवा याठिकाणी झाला. मृत्यूनंतर त्यांचा दहन वाळवा या ठिकाणी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार वाळवा गावात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा दहन झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

BMC Elections: देशातील हिंदू 1992 पुन्हा घडवण्यासाठी तयार... BMC निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्रींचं मुंबईत वक्तव्य! राजकीय अर्थ काय?

Pune Mumbai Journey : पुणे-मुंबई प्रवास आता ९० मिनिटांत! नवीन द्रुतगती मार्गाच्या ‘डीपीआर’ला मंजुरी

New Year Upday 2026: नवीन वर्षात 'या' खास उपायांचे शांतपणे करा पालन, वर्षभर आर्थिक समस्यांचा करावा लागणार नाही सामना

Latest Marathi News Live Update : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT