Arvind Kejriwal - Kumar VIshwas Team esakal
देश

"केजरीवाल म्हणाले, मी स्वतंत्र खलिस्तानचा पहिला पंतप्रधान होईल"

Arvind Kejriwal यांच्यावर कुमार विश्वास यांनी धक्कादायक गंभीर आरोप केले आहेत.

सुधीर काकडे

पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे (Punjab Assembly Elections 2022) वारे वाहत असून, येत्या २० तारखेला मतदान पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. प्रसिद्ध कवी आणि आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केजरीवालांना मी सांगितलं होतं की, फुटीरतावादी संघटनांची मदत घेऊ नका, त्यावर त्यांनी आपल्याला जी उत्तरं दिली ती धक्कादायक होती असा दावा कुमार विश्वास यांनी केला.

अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल काही धक्कादाय खुलासे करताना कुमार विश्वास यांनी गंभीर वक्तव्य केली आहेत. ते म्हणाले की, केजरीवालांना मागच्याच निवडणुकीत आपण सांगितलं होतं की, फुटीरतावाद्यांपासून दुर राहा, त्यांची मदत घेऊ नका. त्यावर केजरीवाल म्हणाले होते की, तुम्ही काळजी करू नका. एक तर मी एका राज्याचा मुख्यमंत्री होईल किंवा एका स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राचा पंतप्रधान होईल. केजरीवाल यांना फक्त सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी ते काहीही करू शकतात असा आरोप कुमार विश्वास यांनी केला.

दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. तीन्ही पक्षांचे मोठे नेते पंजाबमध्ये प्रचारासाठी मैदानात उतरले असून, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्क असल्याचं पाहायला मिळतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT