kumbh mela
kumbh mela 
देश

इतिहासात पहिल्यांदाच कुंभमेळा एका महिन्याचा; कोरोना 'निगेटीव्ह' अहवालही बंधनकारक

सकाळवृत्तसेवा

देहरादून : हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन होत आहे. कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर या कुंभमेळ्याचं आयोजन करणं धाडसाचंच पाऊल ठरणार आहे. कोरोनाची आव्हानात्मक परिस्थिती पाहता या कुंभमेळ्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून स्थानिक प्रशासन देखील याबाबत काही नियमावली करत आहे. आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, हरिद्वारच्या या कुंभमेळ्याचा कालावधी कमी करुन तो 1 महिन्याचा करण्यात आला आहे. कुंभमेळ्यांच्या आजवरच्या इतिहासात असा बदल पहिल्यांदाच करण्यात आला आहे. याबरोबरच खबरदारीचा उपाय म्हणून या मेळ्यात सहभागी होऊ पाहणाऱ्या यात्रेकरुंना कोरोनाचा निगेटीव्ह अहवाल सादर करणे अनिवार्य असणार आहे. 

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये गंगेच्या तीरावर हा कुंभमेळा पार पडणार आहे. आता या मेळ्याचा कालावधी 1 एप्रिल ते 30 एप्रिल असा करण्यात आला आहे. यामध्ये तीन शाही स्नान पार पडणार आहेत. 12, 14 आणि 27 एप्रिलला हे शाही स्नान असणार आहे. या शाही स्नानाच्या दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर गंगेत स्नान करतात. तसेच 13 एप्रिल रोजी चैत्र प्रतिपदेला आणि 21 एप्रिल रोजी राम नवमी रोजी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता देखील प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.  

तब्बल 12 वर्षांतून एकदा आयोजित होणाऱ्या या कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशातले भाविक सामील होतात. हा कुंभमेळा साधारण तीन ते साडेतीन महिन्यांचा असतो. मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा कुंभमेळा एकच महिन्यांचा असणार आहे. मागच्या वेळी हरिद्वारमध्ये असा कुंभमेळा 14 जानेवारी ते 28 एप्रिल 2010 या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी 72 तासांच्या दरम्यानची कोरोनाची निगेटीव्ह अहवाल असलेली RT-PCR टेस्ट सादर करणे अनिवार्य असल्यांचं उत्तराखंड हायकोर्टाने म्हटलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT