Ashish Mishra Team eSakal
देश

केंद्रीय मंत्र्याच्या घरावर पोलिसांनी चिटकवली नोटीस

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या मुलावर शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे.

सुधीर काकडे

लखीमपूर खेरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय वादंग सुरू झाल्याचे पाहायला मिळते आहे. आंदोलन करून परतणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनाखाली चिरडल्याचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या मुलावर करण्यात आला आहे. या प्रकरणात आज दोन जणांना अटक करण्यात आली असून, केंद्रीय मंत्र्याचा मुलगा आशिष मिश्रा फरार असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणात आता उत्तर प्रदेश पोलिसांनी आशिष मिश्रा यांच्यासाठी नोटीस चिटकवली आहे.

शेतकरी आंदोलकांना चिरडल्यानंतर झालेल्या या हिंसाचार प्रकरणात केलेल्या तपासाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाकडून विचारण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस कामाला लागल्याचे दिसते आहे. या प्रकरणात आज पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज सांयंकाळी पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या घरावर नोटिस चिटकवली आहे. त्यानुसार अजय मिश्रला ८ ऑक्टोबर सकाळी १० वाजे पर्यंत पोलिसांसमोर येण्यास सांगितले आहे.

भा.दं.वि.च्या कलम 160 अन्वये चिटकवलेल्या नोटिशीमध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, आशिष मिश्रा यांना 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता गुन्हे शाखा कार्यालय, रिझर्व्ह पोलीस लाईन्स येथे वैयक्तिकरित्या हजर राहावे लागेल. त्यांना लेखी/तोंडी आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी आज या प्रकरणात आरोपी लवकुश राणा आणि आशीष पांडेय यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर लखीमपूर हिंसाचारानंतर मुलावर झालेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave: काळजी घ्या! राज्यात उन्हाचा तडाखा... अकोल्यात ४६.९ अंशांची नोंद, २२ शहरांत ४० पार!

Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे प्रवाशांसाठी खुशखबर! मिसिंग लिंकचे महाराष्ट्रदिनी होणार उद्‍घाटन; खंडाळा घाटातील रखडपट्टी टळणार!

रुग्णालयातील नोंदीत धक्कादायक प्रकार! प्रसूतीवेळी आधारकार्डशिवाय नोंदविले महिलांचे अंदाजे वय; बालमाता शोधण्यासाठी डॉक्टरांची 7 पथके, वाचा...

मोठी बातमी! 355 कार्यालयांमधील सरकारी नोकरदारांनाही ‘ई-केवायसी’चे बंधन; कागदी पगारबिले यापुढे बंद; GR मध्ये जेवढी पदे तेवढ्यांनाच पगार, वाचा...

Panchang 27 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहु काळ, आजचा दिवस शुभ की अशुभ जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT