parrikar
parrikar 
देश

मनोहर भाई अमर रहें; पर्रीकर अनंतात विलीन

वृत्तसंस्था

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काल (ता. 17) त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले होते. मागील वर्षभर ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली व 'मनोहर भाई अमर रहें'च्या घोषणांनी त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला.

दोनापौला येथील त्यांच्या निवासस्थानी काल (ता. 17) संध्याकाळी त्यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी पर्रीकरांच्या कुटूंबियांचे सांत्वन करीत अंत्यदर्शन घेतले. भाजपच्या बड्या नेत्यांसह सामान्य जनतेही पर या साध्या पण मनाने मोठ्या असलेल्या राजकारण्याला निरोप देण्यासाठी गोव्यातून मोठा जनसागर लोटला होता. त्यांच्या पश्चात दोन पुत्र व त्यांचे कुटुंबीय आहेत. शासकीय इतमामात पर्रीकरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

पर्रीकर यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्यासह देशभरात शोकपूर्ण वातावरण आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT