Crime News esakal
देश

Crime News: महिला लेक्चररवर कॉलेजमध्येच पतीचा चाकू हल्ला; विद्यार्थी धावले अन्...

सकाळ डिजिटल टीम

हैद्राबाद - मागील काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. श्रद्धा वालकर हत्येचं प्रकरण ताजे असतानाच हैदराबादमधील एका लेक्चररवर तिच्या पतीने कॉलेज कॅम्पसमध्ये चाकूने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. (Crime news in Marathi)

हैदराबादमधील येथील अनंतपूर कला महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आज एका महिला लेक्चररवर तिच्या पतीने चाकूने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित महिला कॉमर्सची लेक्चरर म्हणून काम करते. वाणिज्य विभागाच्या मैदानावरच महिलेवर हल्ला करण्यात आला.

महिलेचा पती पेरेस याने चाकूने आपल्या पत्नीवर हल्ला केला. जेव्हा हल्ला करण्यात आला तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला, तेव्हा विद्यार्थ्यांनी धावून येत आरोपी पतीला पकडले. त्यानंतर आरोपीला 3 टाऊन पोलिस स्टेशनच्या पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान पीडित महिला आणि तिचा पती गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत आहेत. महिलेने याआधीच पतीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच आधीच पतीकडे घटस्फोट मागितला आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Scheme : लाडक्या बहिणींनो सावधान! योजनेच्या फॉर्मसाठी जास्तीचे पैसे देताय? सरकारने उचललं 'हे' मोठं पाऊल, सेवा केंद्रचालकांचे धाबे दणाणले

Raj Thackeray: जपानी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल… राज ठाकरेंनी मोहन भागवतांना विचारला थेट प्रश्न!

Destination Wedding India: डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करताय? उदयपूरशिवाय निवडा हे 4 शानदार ठिकाण, होईल शाही लग्नाचे स्वप्न पूर्ण

हायवे बनवा किंवा टोल वसुली थांबवा! रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मित्र गमावला, तरुणांचा टोल नाक्यावर गोळीबार; चिठ्ठीतून दिली धमकी

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT