live in relationship 
देश

लिव्ह इन रिलेशनशिप याचिका कोर्टाचा वेळ घेतात - उच्च न्यायालय

आम्ही परस्परांना वर्षभरापासून ओळखतो आणि वेळेबरोबर आमच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

दीनानाथ परब

मोहाली: लिव्ह इन रिलेशनशिपच्या (Live in relationship) संबंधातून अनेक याचिका दाखल होतात. पण यातील फार कमी याचिकाकर्त्यांना थेट धोका असतो. बहुतांश याचिका या काल्पनिक कारणांवर आणि तर्कावर आधारित असतात, असे पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने (punjab & haryana high court) लिव्ह इन रिलेशनशिपशी संबंधित याचिका निकाली काढताना म्हटले आहे. (Live in relationship petitions takes time of court punjab & haryana high court)

न्यायाधीश मनोज बजाज यांचे खंडपीठ दया राम आणि रीनू यांच्या याचिकेवर सुनावणी करत होते. दोघेही आम्ही परस्परांना वर्षभरापासून ओळखतो आणि वेळेबरोबर आमच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पण रीनूच्या आई-वडिलांचा या नात्याला विरोध आहे, असे याचिकेत म्हटले होते.

आम्हाला आमचं बर-वाईट समजतं. तेवढे आम्ही परिपक्व आहोत. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला पण रीनूचे आई-वडिल आणि अन्य नातेवाईकांनी विरोध केला. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याशिवाय आमच्याकडे काहीही पर्याय नाहीय. आमच्यात अजून कुठलेही शारीरिक संबंध नसून विवाहयोग्य वयाची वाट पाहत आहोत, असे त्यांनी याचिकेत म्हटले होते.

मागच्या काही वर्षात समाजात सामाजिक मुल्यांमध्ये मोठे परिवर्तन झालेय. अनेक युवक स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी आई-वडिलांचं घर सोडतात. त्यानंतर आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत राहण्याकडे त्यांचा कल असतो. आपल्या जीवनाला धोका आहे असे दाखवून सुरक्षा मिळवण्यासाठी याचिका दाखल करतात. आपल्या नात्यावर त्यांना कोर्टाकडून शिक्कामोर्तब हवं असतं, असं कोर्टाने म्हटलं आहे. अशा प्रकारच्या बहुतांश याचिकांमध्ये मुलीच्या निर्णयाला विरोध करणारे तिचे आई-वडिल आणि अन्य नातेवाईकांकडून धोका असल्याचे दाखवले जाते. त्यावरच या याचिका आधारीत असतात. कारण अशा निर्णयांना मुलाच्या कुटुंबाकडून विरोध होण्याची शक्यता कमी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT