lockdown india google pay launch nearby spot service for users serach stores 
देश

लॉकडाऊनच्या काळात 'गुगल पे'ची खास सेवा...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंमुळे नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. गुगलने नागरिकांची हिच गरज ओळखत गुगल पेच्या माध्यमातून खास सेवा सुरू केली आहे.

भारतात 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या नागरिकांसाठी गुगलने Nearby Spot लाँच केले आहे. गूगल पे च्या माध्यमातून ही सेवा दिली जात आहे. यामध्ये स्थानिक भागात जवळपास सुरू असलेली किराणामालाची दुकाने आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने यांची माहिती मिळणार आहे. सध्या बंगळूरमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही सेवा हैद्राबाद, चेन्नई, मुंबई, पुणे आणि दिल्लीत सुरू होणार आहे.

लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंगच्या नियमामुळे डिजिटल पेमेंट महत्वाचे ठरते आहे. गूगल पे आता यामध्येच डिजिटल पेमेंटशिवाय लोकांना कोरोनाच्या संकटकाळात मदतीसाठी पुढे आले आहे. फक्त अत्यावश्यक सेवेबद्दलच नाही तर देशाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येणारी माहितीसुद्धा गूगल पे देत आहे. PM CARES fund, मुख्यमंत्री सहाय्यता निधी यासह इतर मदतीसाठी COVID 19 SPOT तयार केला आहे.

गूगल पेवरून PM CARES मध्ये 105 कोटी रुपये लोकांनी जमा केले आहेत. गुगलने योग्य आणि अचूक माहिती भारतीय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही पावले उचलली आहेत. त्यामध्ये अधिकृत माहिती देणे, सध्याच्या काळात उपयोगी पडेल, अशी माहिती देण्यावर कंपनी भर देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT