Tejasvi Surya vs Supriya Sule esakal
देश

Tejasvi Surya घराणेशाहीवर बोलताच Supriya Sule संतापल्या

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारनं आपली सत्ता टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक देशाला गरीब ठेवलं.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) नेते तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी काल (बुधवार) आधीच्या सरकारवर आणि त्यांच्या घराणेशाहीवर जोरदार निशाणा साधला. सूर्या म्हणाले, समाजवादी विचारसरणी असलेल्या काँग्रेसच्या (Congress Government) नेतृत्वाखालील सरकारनं घराणेशाही चालू ठेवण्याच्या उद्देशानं देशाला गरीब ठेवलं. मोदी सरकारच्या (Modi Government) आधी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश एका कुटुंबाच्या (गांधी घराणं) ताब्यात होता, असा स्पष्ट उल्लेखही त्यांनी केलाय.

लोकसभेत (Lok Sabha) केंद्रीय अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) वरील चर्चेत भाग घेत सूर्या म्हणाले, यापूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारनं आपली सत्ता टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक देशाला गरीब ठेवलं. बंगळुरू दक्षिणचे खासदार सूर्या पुढे म्हणाले, काँग्रेसच्या घराणेशाहीमुळं देशाची अर्थव्यवस्था बिघडली असून मोदी सरकारच्या काळात ती सुधारलीय. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे घराणेशाही नेते आपली राजकीय बेरोजगारी ही देशाची बेरोजगारी समजून गोंधळ घालत आहेत. या देशात जर कोणी बेरोजगार असेल तर तो काँग्रेसचा (Congress Party) 'युवराज', काँग्रेसचा वंशज आहे, असं सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केलीय.

राहुल गांधींच्या 'दो हिंदुस्तान'च्या विधानाचा संदर्भ देत तेजस्वी म्हणाले, होय.. दोन भारत आहेत; एक केंद्रात आणि दुसरा 2014 नंतरचा भारत, असं त्यांनी नमूद केलं. तर दुसरीकडं राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सभागृहातील चर्चेत भाग घेत सूर्या यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. घराणेशाहीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, कर्नाटकातील भाजप आमदार रवी सुब्रमण्यम यांच्याशी सूर्यांचा संबंध काय? असा थेट सवाल सुळेंनी विचारलाय. त्यांनी भाजप सदस्य प्रीतम मुंडे, पूनम महाजन, हीना गावित, रक्षा खडसे, एस. विखे-पाटील, ज्योतिरादित्य सिंधिया, पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांचीही नावंही घेतली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT