Stay alert for 72 hours Notice of Election Commission of India 
देश

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तारखा 'या' दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडं अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडं अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम १३ मार्चनंतर जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (lok sabha election 2024 dates announced after 13 march says eci sources)

निवडणूक आयोगाकडून तयारीची आढावा सुरु

या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाकडून विविध राज्यांमध्ये सध्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेतल्या जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना काय अडचणी आहेत या जाणून घेतल्या जात आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स अर्थात इव्हीएम्स, सुरक्षा रक्षकांची गरज तसेच राज्यांच्या सीमांवर देखरेखीसाठीची तयारी यासांरख्या बाबींचा यामध्ये समावेश आहे. (Latest Marathi News)

१३ मार्चनंतर घोषणेची शक्यता

दरम्यान, निवडणूक आयोगाची टीम पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये पुढच्या आठवड्यात भेट देणार आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरला देखील १३ मार्च रोजी भेट देणार आहे. त्याचबरोबर १३ मार्चपर्यंत सर्व राज्यांच्या निवडणूक तयारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं १३ मार्चनंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

यंदा ९७ कोटी मतदार ठरले पात्र

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ९७ कोटी मतदार पात्र ठरले आहेत. यामध्ये ६ टक्क्यांनी नव्या मतदारांची वाढ झाली आहे. तसेच सुमारे २ कोटी नव मतदारांचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती नुकतीच निवडणूक आयोगानं जाहीर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : काल सोनं स्वस्त झालं म्हणून खरेदीचा विचार करताय? तर थांबा! आजचा भाव पाहा मग ठरवा...

Malegaon Municipal Election : मालेगावात भाजपची एमआयएमशी छुपी युती; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा सनसनाटी आरोप, भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले....

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची संक्रांत होणार गोड! ४ दिवसात जमा होणार ३ हजार... अधिकृत घोषणा!

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला

Vashi Crime : ‘तुझाही संतोष देशमुख करू’ म्हणत सरपंचाला मारहाण; पवनचक्कीच्या कामावरून घडली घटना

SCROLL FOR NEXT