Rahul Gandhi News esakal
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी जाणार? लोकसभा सचिवालयाने धाडली नोटीस

संतोष कानडे

नवी दिल्लीः राहुल गांधी यांच्या खासदारकीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या एका विधानामुळे लोकसभा सचिवालयाने त्यांना नोटीस जारी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधाने केलेल्या एका विधानामुळे राहुल गांधी अडचणीमध्ये सापडले आहेत. त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीचं उत्तर १५ फेब्रुवारीपर्यंत द्यावं लागणार आहे.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस राहुल गांधींना पाठवली आहे. 'सभापतींना कोणतीही माहिती दिल्याशिवाय पंतप्रधानांवर आरोप करता येणार नाहीत' असं निशिकांत दुबे म्हणाले. विहीत वेळेमध्ये राहुल गांधींनी आपलं म्हणणं मांडलं नाही तर त्यांना माफी मागावी लागेल नाहीतर त्यांना लोकसभेची जागा गमवावी लागेल, असं दुबे म्हणाले.

हेही वाचाः अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलतांना राहुल गांधी यांनी पंतप्रधानांसंदर्भामध्ये विधान केलं होतं. उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये वाढ झाली, हे सांगतांना त्यांनी त्यांचा संबंध थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला होता. गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मैत्री असल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता.

राहुल गांधींच्या विधानानंतर त्यांना १० फेब्रुवारी रोजी लोकसभा सचिवालयाने नोटीस जारी केली आहे. हे विधान दिशाभूल करणारे आणि असंसदीय आहे, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. नियम ३७३, ३७४ आणि ३७४अ अंतर्गत सभापती एखाद्या सदस्याला नियमांचं उल्लंघन केल्याच्या ठपका ठेवत निलंबित करु शकतात. त्यामुळे राहुल गांधींची खासदारकी धोक्यात आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT