देश

Lokayukta Raid : सत्तेत असणाऱ्या भाजप आमदाराच्या घरावर धाड; तब्बल 'इतकी' कोटी रक्कम जप्त; लाचखोर मुलगाही अटकेत!

निवडणुका तोंडावर आल्या असताना कर्नाटकात आज एक खळबळजनक घटना उघडकीस आलीये.

सकाळ डिजिटल टीम

आमदार विरुपक्षप्पा यांच्या अधिकारी असलेल्या मुलानं 40 लाख रुपयांची लाच घेतल्यामुळं त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता आमदारांच्या घरावरही लोकायुक्तांनी धाड टाकली.

बेंगळुरू : निवडणुका तोंडावर आल्या असताना कर्नाटकात आज एक खळबळजनक घटना उघडकीस आलीये. इथं बेंगळुरू जल आपूर्ती आणि सीवरेज बोर्डचे (BWSSB) मुख्य लेखापाल प्रशांत मदल यांना कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी 40 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली.

प्रशांत हे चन्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या (Channagiri Assembly Constituency) विद्यमान आमदाराचे सुपुत्र आहेत. या कारवाईनंतर आमदार मदल विरुपक्षप्पा (Madal Virupakshappa) यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली असून घरातून मोठी रक्कम जप्त करण्यात आलीये.

आमदार विरुपक्षप्पा यांच्या अधिकारी असलेल्या मुलानं 40 लाख रुपयांची लाच घेतल्यामुळं त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता आमदारांच्या घरावरही लोकायुक्तांनी धाड टाकली असून 6 कोटी रुपयांची रक्कम जप्त केलीये. तर, मुलाच्या कार्यालयातून 2 कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. कर्नाटकात सध्या भाजपचं सरकार (BJP Government) असून विरोधकांकडून सातत्यानं भाजप नेत्यांवर लाचखोरीचा आरोप करत आहे. या कारवाईमुळं भाजप बॅकफूटवर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT