देश

Loksabha 2019 : 'हुक्केरींच्या विरोधात कत्ती की जोल्ले?

सकाळवृत्तसेवा

निपाणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापत असून उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता बरेच दिवस ताणली गेली. अखेर काँग्रेसने खासदार प्रकाश हुक्केरी यांची उमेदवारी जाहीर केल्याने त्यांचा प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. आता त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी खासदार रमेश कत्ती की सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांना रिंगणात उतरविण्यात येणार याकडे संपूर्ण मतदारसंघाच्या नजरा लागल्या आहेत.

निवडणूक यंत्रणा कामाला लागली असून कार्यकर्त्यांमध्ये इलेक्‍शन फिव्हर जाणवू लागला आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. गतवेळच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असतानाही भाजपाचे उमेदवार रमेश कत्ती यांचा काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी ३००३ मतांनी पराभव केला होता. यंदाही काँग्रेसने खासदार हुक्केरी यांना रणांगणात उतरविले आहे. पण भाजपकडून उमेदवारीचा तिढा सुटण्यास वेळ लागत आहे.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात आजवर काही अपवाद वगळता काँग्रेसलाच मतदारांनी साथ दिली आहे. त्यामुळे येथे खासदार हुक्केरी यांचे वर्चस्व आहे. शिवाय त्यांचे चिरंजीव आमदार गणेश हुक्केरी चिक्कोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा विजयी झाले आहेत. उमेदवारीच्या घोषणेआधीच हुक्केरी पिता-पुत्रांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला चिक्कोडी मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपनेही व्यूहरचना केली आहे. त्यांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसला तरी माजी खासदार रमेश कत्ती, सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले यांची नावे चर्चेत आहेत. माजी खासदार रमेश कत्ती यांनी यापूर्वी या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून जिल्ह्यावर वरचष्मा आहे. माजी मंत्री आमदार उमेश कत्ती यांचे पाठबळही त्यांना आहे.

गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत जोल्ले यांनी आपली ताकद अजमावली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. शिवाय त्यांच्या पत्नी आमदार शशिकला जोल्ले यांनीही या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे नजिकच्या काळात भाजपचे तिकीट कोणाला मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. लवकरच भाजपचे उमेदवार जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

घोषणेआधीच प्रचार
खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या पाठोपाठ उमेदवारीच्या घोषणेआधीच सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले यांनी धार्मिक स्थळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांसह प्रचार चालविला आहे. माजी खासदार रमेश कत्ती यांनीही जोर लावल्याची चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT