Chitra Ramkrishna_NSE Former MD 
देश

NSEच्या माजी एमडी चित्रा रामकृष्णनविरोधात लुकआऊट नोटीस; CBI चौकशी सुरु

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : शेअर मार्केट हिमालयातील एका अध्यात्मिक गुरुच्या आदेशानुसार चालवला जात असल्याचा आरोप नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) माजी एमडी चित्रा रामकृष्णन यांच्यावर आहे. नुकताच सेबीनं (SEBI) हा धक्कादायक खुलासा केला होता. यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल इन्कम टॅक्स विभागानं घेतली असून रामकृष्णन यांच्या मुंबईतील घरासह इतर विविध ठिकाणांवर छापेमारी सुरु केली आहे. (Income tax department raids former NSE MD Chitra Ramakrishnan premises)

सध्या NSE च्या माजी एमडी आणि CEO चित्रा रामक्रिशन यांची सीबीआय चौकशी करत आहे. याच प्रकरणात रवी नायर आणि आनंद सुब्रमण्यम यांचीही चौकशी करण्यात आली आहे. सीबीआयने या तिघांविरोधात लुक आऊट नोटीस जारी केल्याचे सूत्रांनी सांगितलंय.

इन्कम टॅक्स विभागाकडून चित्रा रामकृष्णन यांच्या मुंबईतील घरासह इतर ठिकाणांवर छापेमारी सुरु केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात NSE च्या समूह संचालन अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या सल्लागार म्हणून आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली होती. यासाठी त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं असून सेबीकडूनही त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, सेबीनं नुकतंच खुलासा करताना म्हटलं होतं की, हिमालयातील एका गुरुच्या सांगण्यावरुन NSEच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण प्रत्येक निर्णय घेत होत्या. विशेष म्हणजे या गुरुला चित्रा यांनी स्वतः काधीही पाहिलेलं नाही. तीन वर्षे राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजचं काम त्यांनी या गुरुच्या सांगण्यावरुनच करत होत्या, असा दावा करण्यात आला आहे.

हिमालयातील अध्यात्मिक गुरु

सेबीच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, NSEच्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयात राहणाऱ्या योगी पुरुषाचा प्रभाव होता. या योगीच्या सांगण्यावरुनच त्यांनी आनंद सुब्रमण्यम यांना एनएसईत समूह ऑपरेशनल अधिकारी आणि एमडीच्या सल्लागारपदी नियुक्ती केली होती. चित्रा रामकृष्ण या सन २०१३ पासून डिसेंबर २०१६ पर्यंत एनएसईच्या एमडी आणि सीईओ होत्या. अज्ञात अध्यात्मिक गुरुला त्या शिरोमणी असं संबोधत होत्या. ही व्यक्ती म्हणजे एक अध्यात्मिक व्यक्ती असून गेल्या २० वर्षांपासून त्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक गोष्टींवर त्यांचं मार्गदर्शन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT