Narendra Modi 
देश

Narendra Modi : "मोदी अदानी भाई-भाई " ; विरोधकांची राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी, मोदींची कोंडी!

सकाळ डिजिटल टीम

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले होते.

दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोदी अदानी भाई-भाई, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. काल लोकसभेत केलेल्या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी अदानी प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नव्हते.

विरोधकांनी गौतम अदानी प्रकरणात चौकशीची मागणी केली. नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होताच काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभागृहात 'मोदी-अदानी भाई-भाई'च्या घोषणा अनेकवेळा देण्यात आल्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोधी खासदारांना टोला लगावला. 

यावेळी मोदी यांनी देखील विरोधकांना टोला लगावला. कितीही चिखल फेका कमळ चिखलातच चांगलं फुलते. राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेत सडकून टीका केली होती. त्याला मोदींनी काल लोकसभेत उत्तर दिलं, पण यामुळं समाधान न झाल्याने आज राज्यसभेत मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. पण मोदींनी सेक्युलॅरिझमचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदी म्हणाले, "विविध सरकारांनी ज्या ज्या योजना आणल्या, त्या सर्व पात्र लाभार्थांपर्यंत पोहोचत आहेत की नाही, हे निश्चित करण्याचं काम खरा सेक्युलॅरिझम करत असतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT