love jihad Case, Mumlim, man arrested
love jihad Case, Mumlim, man arrested 
देश

हिंदू पत्नीला उर्दू शिकण्याची जबरदस्ती करणाऱ्या पतीला अटक

सकाळ ऑनलाईन टीम

उत्तर प्रदेशप्रमाणेच मध्यप्रदेश सरकारही आता लवकरच 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा आणणार आहे. यासाठी वेगाने हालचाली सुरु असताना राज्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.  शहडोलमध्ये धर्मांतरासाठी दबाव आणण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेने आपल्या पती विरोधात जबरदस्तीने धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात तिच्या पतीला अटक करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. 

शहडोल येथील धनपुरीमधील हिंदू तरुणीने 2 वर्षांपूर्वी 2018 मध्ये मोहम्मद इरशाद खान नावाच्या एका व्यक्तीशी विवाह केला होता. महिलने केलेल्या तक्रारीनुसार, विवाहानंतर आता संबंधित मुस्लीम कुटुंबिय तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत आहे. तिने उर्दू आणि अरबी भाषा शिकावी असा त्यांचा अट्टहास असून  पीडितेला मारहाण देखील करण्यात आली. त्यामुळे ती माहेरी परतली असून सासरच्या मंडळींसह पतीविरोधात तिने तक्रार दाखल केली आहे.

धर्माच्या नावाखाली होणारा छळ आणि उर्दू शिकण्याची जबरदस्ती यातून होणाऱ्या छळाला कंटाळून तरुणी 27 नोव्हेबरला सासरचे घर सोडून माहेरी परतली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद इरशाद खान याच्यावर गुन्हा दाखल केला असून पतीला अटकही करण्यात आली आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT