Crime Latest News आग्रा : बिहारमधील तरुणाची पश्चिम बंगालमधील तरुणीशी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात (Lover) झाले. दोघांनी एकमेकांचे नंबर दिले. यानंतर फोनवर चर्चा सुरू झाली. एकेदिवशी तरुण पश्चिम बंगालमध्ये पोहोचला. मुलीला घरातून पळवून घेऊन गेला. हा तरुण प्रेयसीला अहमदाबादला घेऊन जात होता गाडीमध्ये दोघांमध्ये वाद झाला. यानंतर मुलगी स्टेशनवर उतरली आणि थेट जीआरपी पोलिस ठाण्यात गेली. तरुणही मागून पोहोचला. तरुणाने पोलिस कर्मचाऱ्याची पिस्तूल हिसकावून स्वतःवर गोळी (Firing) झाडली.
गोळी तरुणाच्या हाताला घासून निघाली. जीआरपीने जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले आहे. पश्चिम बंगालच्या अलिद्वारपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेली मुलगी बुधवारी सायंकाळी उशिरा आग्रा फोर्ट स्टेशनवर जीआरपी पोलिस ठाण्यात पोहोचली. तरुणीने बिहारमधील मुंगेर येथील हिमांशू कुमार या तरुणाविरुद्ध आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार दिल्याची माहिती एसपी रेल्वे मोहम्मद मुश्ताक यांनी दिली.
पोलिस तरुणीची तक्रार घेत असताना हिमांशू पोलिस ठाण्यात घुसला आणि निरीक्षकाचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून पळाला. तरुणाला पकडण्यासाठी पोलिस धावले असता तरुणाने पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने गोळी (Firing) तरुणाच्या हाताला घासून निघाली. पोलिसांनी तात्काळ तरुणाला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
दोघांची फेसबुकवर भेट
पश्चिम बंगालमध्ये (Paschim Bengal) राहणारी तरुणी आणि हिमांशू यांची फेसबुकवर भेट झाली. गेल्या वर्षी हिमांशूने मुलीला आमिष दाखवून घरातून पळवून नेले होते. मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्याने पुन्हा मुलीला घरातून पळवून नेले आणि अहमदाबादच्या ट्रेनमध्ये बसले. हिमांशूने मुलीचा मोबाईलही ताब्यात घेतला होता. ट्रेनमध्ये दोघांमध्ये वाद झाला आणि आग्रा फोर्ट स्टेशनवर ट्रेन थांबताच तरुणीने जीआरपी पोलिस स्टेशन गाठले. दोघांचे कुटुंबीय आग्रा येथे पोहोचले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.