lover suicide in faridabad at haryana 
देश

युवतीने रडत-रडत लिहीले वडिलांना पत्र; प्रेमात फसले...

वृत्तसंस्था

फरीदाबाद (हरियाणा): पप्पा, तुम्ही खूप चांगले आहात. पुढच्या जन्मीही तुमचीच मुलगी म्हणून जन्माला येईल. मी प्रेमात फसले असून, आत्महत्या करत आहे, असे युवतीने रडत-रडत पत्र लिहून आत्महत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रियकर विवाहीत असून, त्याला दोन मुले आहेत. पत्नी दुसऱया शहरामध्ये राहात आहे. युवती तीन महिन्यांपासून बेपत्ता झाली होती. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. दोघांनी विवाह होऊ शकणार नसल्यामुळे नैराष्यात येऊन नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी घराच्या दरवाजावर माहिती लिहून त्याचा फोटो काढून व्हॉट्सऍपवर शेअर केले होते.

आत्महत्येपूर्वी घराच्या दरवाजावर युवतीने लिहीले आहे की, पप्पा, तुम्ही खूप चांगले आहात. पुढच्या जन्मीही तुमचीच मुलगी म्हणून जन्माला येईल. मी प्रेमात फसले असून, आम्ही स्वखूशीने आत्महत्या करत आहोत. हे लिहीताना मी रडत आहे. प्रियकराने घरातील दुसऱया दरवाजावर सुसाईड नोट लिहीली आहे. दोघांनी फोटो काढून व्हॉट्सऍपवरून शेअर केले होते.

पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली मधील युवक व येथील सुर्या कॉलनीमध्ये राहणाऱया युवतीने आत्महत्या केली आहे. दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून, शवविच्छेदन अहवालासाठी पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरकरांना हवाई प्रवासाचा झटका; मुंबईसह अनेक शहरांची विमानसेवा दोन महिन्यांसाठी बंद, कारण काय?

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन गिलची विकेट अन् वाचला विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सचा ऑल टाईम रेकॉर्ड...

Paithan Chowk Chaos: पाचोडमध्ये वाहतूक कोंडीचा कळस; आठवडी बाजाराच्या दिवशी पैठण चौक ठप्प, नागरिक हैराण

IPL 2026 Final, RCB vs GT live: गुजरात टायटन्सचे सलामीवीर अपयशी, वैभव सूर्यवंशीला लागली लॉटरी

SSC Marksheet Distribution: दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप; सकाळी शाळांना, दुपारी विद्यार्थ्यांना वितरण

SCROLL FOR NEXT