Lovers Couple
Lovers Couple Lovers Couple
देश

पोलिसांना जे तीन वर्षांत जमले नाही ते काम कोरोना लसीने केले

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाची लस घेतल्याने कोणी बोलू लागले तर कोणाची गुडघेदुखी दूर झाली. यामुळे एकदा दोनदा नव्हे तर तब्बल १७ वेळा लस घेतल्याचा दावा एकाने केला. असे एक ना अनेक किस्से एकायला मिळत आहे. आता कोरोना लसीने फरार झालेल्या जोडप्याचा पत्ता दिला. या जोडप्याचा शोध पोलिस तीन वर्षांपासून घेत होती. ही घटना राजस्थानच्या जोधपूरमध्ये घडली.

२०१९ मध्ये मगरा पुंजाला येथील गांधीनगरमध्ये राहणारा तरुण आयटीआयला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. खरं तर तो शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत फरार झाला होता. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात (police) तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आदी ठिकाणी दोघांचा शोध घेतला होता. मात्र, ते सापडले नाहीत.

मुलीला घेऊन फरार झाल्यानंतर मुलगा झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करायचा. पोलिसांनी झोमॅटो कंपनीकडेही चौकशी केली. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. या गोष्टीला तीन वर्षे उलटून गेली. अचानक एक दिवशी मुलीच्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर मेसेच आला. यामध्ये दोघांनी चंदीगडमध्ये कोरोनाची लस घेतल्याचे समजले. मुलीचे आधारक्रमांक घरच्या मोबाईल नंबरशी लिंक केले होते. अशा स्थितीत घरच्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. कुटुंबीयांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चंदीगड गाठून दोघांनाही जोधपूरला घरी आणले.

कोरोनाच्या काळातही ते परतले नाही

जोधपूरमधून पळून गेल्यानंतर हे प्रेमीयुगुल (lovers) प्रथम दिल्लीत पोहोचले. त्यानंतर दोघेही चंदीगडमध्ये (Rajasthan) राहू लागले. चंदीगडमध्ये दोघांनी लग्न केले आणि भाड्याची खोली घेऊन राहू लागले. यानंतर दोघेही तिथे काम करू लागले. कोरोनाच्या काळातही दोघेही घरी परतले नाही. शासनाकडून मिळणारे रेशन वगैरे घेऊन जगत राहिले. मात्र, कोरोना लसीच्या नोंदणीमुळे दोघांनाही पोलिसांनी पकडले.

उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले

दोघांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आल्यावर कुटुंबीयांनी राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना चांगलेच फटकारले होते. तसेच दोघांना लवकरच न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पोलिसांना ते सापडतच नव्हते. हायकोर्टात पुन्हा सुनावणी होण्यापूर्वीच कोरोना लसीमुळे पोलिसांचे काम सोपे झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT