well well
देश

मध्यरात्री गेला प्रेयसीला भेटायला; दाट धुक्यामुळे विहिरीत पडला अन्...

अनेक प्रयत्न करूनही ती त्याला बाहेर काढू शकली नाही

सकाळ डिजिटल टीम

प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. मात्र, दाट धुक्यामुळे विहिरीत पडला. प्रियकर विहिरीत पडल्याचे (Lovers fell into the well) पाहून प्रेयसीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु, यश आले नाही. प्रियकराला विहिरीतून बाहेर काढता न आल्याने ती विहिरीजवळ बसून रडू लागली. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोकही जमा झाले. ही घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील बिजनौरमधील माटी परिसरात रविवारी घडली.

माटी परिसरात रविवारी रात्री प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी पोहोचला. मात्र, धुक्यामुळे काहीही स्पष्ट दिसत नव्हते. अशात प्रियकर रस्त्याच्या कडेला बांधलेल्या विहिरीत (Lovers fell into the well) पडला. प्रियकर विहिरीत पडल्याची माहिती मिळताच प्रेयसीने विहिरीकडे धाव घेतली. प्रियकर ४० फूट खोल विहिरीत पडल्याचे पाहून ती घाबरली. पकडले जाण्याच्या भीतीने प्रेयसीने गुपचूप प्रियकराला विहिरीतून बाहेर काढण्याची युक्ती अवलंबली. मात्र यश मिळाले नाही.

अनेक प्रयत्न करूनही ती त्याला बाहेर काढू शकली नाही. बराच वेळ प्रयत्न करूनही प्रियकराला विहिरीतून काढू न शकल्याने ती विहिरीजवळ बसून रडू लागली. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे काही लोक जमा झाले. गावातील लोकांनी विचारल्यानंतरही ती काहीही बोलायला तयार नव्हती.

वारंवार विचारणा केल्यावर तिने संपूर्ण घटना (Lovers fell into the well) सांगितली. यानंतर लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून विहिरीत दोर टाकून तरुणाला बाहेर काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीत पाणी नसणे तरुण वाचला. अन्यथा तरुणाचे प्राण वाचवणे कठीण झाले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT