Madhya Pradesh Civil Election esakal
देश

BJP : माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा 'भगवा' फडकला

निवडणुकीत काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकीत काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.

Madhya Pradesh Civil Election : मध्य प्रदेशच्या नागरी निवडणुकांकडं 2023 च्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) सेमीफायनल म्हणून पाहिलं जात आहे. मात्र, असं असताना निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी धक्कादायक ठरत आहेत. कारण, पक्षातील बड्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेसला (Congress) पराभवाला सामोरं जावं लागतंय.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Congress leader Digvijay Singh) यांचा बालेकिल्ला असलेली नगर परिषद चंचोडा (Chanchoda Nagar Parishad) भाजपनं (BJP) काबीज केलीय. चांचोडामध्ये भाजपला सहा, तर चारवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. तर, दुसरीकडं काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. दिग्विजय सिंह चंचोडा इथं तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने पक्षश्रेष्ठींचा तणाव वाढलाय.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू

आज मध्य प्रदेशातील 214 शहरी संस्थांमध्ये मतमोजणी सुरूय. दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या 5 महानगरपालिका, 40 नगरपालिका आणि 169 नगरपरिषदांच्या मतमोजणीला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. याआधी 17 जून रोजी पहिल्या टप्प्यातील निकालांमध्ये भारतीय जनता पक्षानं झेंडा फडकवला होता. मात्र, त्यांना महापालिकेतील 4 महापौरपदं गमवावी लागली. छिंदवाडा, ग्वाल्हेर आणि जबलपूरमध्ये काँग्रेस तर सिंगरौलीमध्ये आम आदमी पार्टीनं बाजी मारलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI on Gold : सोन्याच्या दराबाबत सेबीचा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; पत्रकार परिषद घेत म्हणाले...

Rare Vulture Sighting:लखाडमध्ये ‘जीपीएस’सह दुर्मिळ गिधाडाचे दर्शन; पेंच संरक्षण केंद्राशी नाळ जोडली!

Holi Holiday: मोठी बातमी! होळीपूर्वी पगार होणार; ३ दिवस सुट्टी मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ambulance Accident: रुग्णवाहिकेची चाकेच निखळतात तेव्हा...,आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर; चालकाने जे केलं ते खतरनाक

SCROLL FOR NEXT