Madhya Pradesh Election 2023 CM candidate for BJP Shivraj Chauhan 
देश

Madhya Pradesh CM candidate for BJP : मध्यप्रदेशमध्ये येणार का 'शिंदे सरकार', कोण होणार भाजपचा मुख्यमंत्री?

भाजपनं सत्ताधारी पक्ष म्हणून आपली मोहोर उमटवली आहे. या सगळ्यात चर्चा सुरु झाली आहे ती मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री होणार कोण?

युगंधर ताजणे

Madhya Pradesh Election 2023 CM candidate for BJP Shivraj Chauhan : मध्यप्रदेशमध्ये भाजपानं ठरल्याप्रमाणे मुसंडी मारली आहे. विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये शिवराज सिंह यांनी पुन्हा एकदा आपणच सरस आहोत हे दाखवून दिले आहे. सध्या तरी मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत कमळ फुलल्याचे दिसून आले आहे. कॉग्रेस पिछाडीवर आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपनं १५७ जागांवर विजय मिळवल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे कॉग्रेसला ७१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अद्याप आणखी काही जागांची मोजणी सुरु आहे. हे अंतिम चित्र नसले तरी भाजपनं सत्ताधारी पक्ष म्हणून आपली मोहोर उमटवली आहे अशी चर्चा आहे. या सगळ्यात चर्चा सुरु झाली आहे ती मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री होणार कोण?

Healthy Homes का वाढते आहे आरोग्यपूर्ण घरांची मागणी?

गेल्या चार दशकांहून अधिक काळ मध्य प्रदेशच्या राजकारणावर पकड असणाऱ्या शिवराज सिंह हेच पुन्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले जात आहे. मात्र ज्योतिरादित्य शिंदे आणि कैलास विजयवर्गीय यांची कडवी टक्कर असणार अशीही कुजबूज आहे. एकाच पक्षातील हे तीन नेते, आता मुख्यमंत्री पदासाठी भिडणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेतेमंडळीपर्यत शिवराज सिंह यांचे असणारे वजन त्यांना फलदायी ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

यापूर्वी एका मुलाखतीमध्ये भाजपचे राष्ट्रीय महासचिनव कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले होते की, नवा मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीतील नेते ठरवतील. पक्षांतील महत्वाचे नेते याविषयी चर्चा घेणार आणि त्यांचा निर्णय जाहीर करतील, त्यामुळे आपण त्यावर अधिक काही बोलणार नाही. जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. आता कॉग्रेसनं हार मानली आहे. हारल्यानंतर कॉग्रेस नेहमीप्रमाणे इव्हीएम मशीनवर आरोप करणार हे आम्हाला माहिती आहे.

भाजपमध्ये लोकतंत्र आहे. आम्हाला जो योग्य व्यक्ती मुख्यमंत्रीपदी वाटेल ते नाव आम्ही दिल्लीतील वरिष्ठांना सांगणार आहोत त्यातून ते नाव सांगतील जो निर्णय असेल त्याचे स्वागत केले जाईल. अशा शब्दांत विजयवर्गीय यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

ज्योतिरादित्य शिंदेचा रोल काय?

मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांनी शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. प्रश्न आहे तो मुख्यमंत्री होणार कोण, एकेकाळी मुख्यमंत्रीपद न दिल्यामुळे कॉग्रेस सोडून भाजपच्या गोटात गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना यावेळी संधी मिळेल असा भाजपमधील एक गट म्हणतो आहे. त्यांचे पक्षातील स्थान मोठे आहे.

गेल्या वेळेला कॉग्रेसला सत्ता स्थापनेची मोठी संधी असताना केवळ मुख्यमंत्रीपदी होणार कोण, यामुळे त्यांना हार मानावी लागली होती. पक्षांतर्गत फूट पडून त्याचा तोटा कॉग्रेसला झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड करुन आपली चूल भाजपच्या घरात जाऊन मांडली आणि तिथुनच कॉग्रेसचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं. आता ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजप संधी देणार की पुन्हा चौहान यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार याची समस्त मध्यप्रदेशवासीयांना उत्सुकता आहे.

चौहान किंगमेकर?

मध्य प्रदेशमध्ये किंग मेकर म्हणून नेहमीच लोकप्रिय ठरलेल्या नेत्यांपैकी एक म्हणजे शिवराज सिंह. चार दशकांहून अधिक काळ राजकीय नेतृत्वाचा अनुभव असलेल्या शिवराज यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पुन्हा पसंती मिळेल असे भाजपच्या वरिष्ठ गटाकडून सांगण्यात येत आहे. शिवराज यांना त्यांच्याच पक्षात मोठं आव्हान हे शिंदे यांनी तयार केलं आहे. पक्षांतर्गत तयार झालेले गट आणि शिंदे यांची तरूणांमधील लोकप्रियता यामुळे त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशीही शक्यता आहे.

कैलाश विजयवर्गीयही तयार?

शिवराज सिंह, ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबरोबर कैलास विजयवर्गीय यांचे नाव देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. त्यांनीही अप्रत्यक्षपणे आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहोत हे अनेकदा मुलाखती, जाहीर सभांमधून सांगितले आहे. इंदौर १ मधून उमेदवारी मिळाल्यानंतर विजयवर्गीय यांनी ज्याप्रकारे बोलण्यास सुरुवात केली त्यावरुन तेच आता मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत अशी वातावरण निर्मिती झाली. भोपाळमध्ये बसून आपण सगळी सुत्रं फिरवणार असं विधानही त्यांनी केलं होतं.

आपण फक्त काही आमदार व्हायला आलेलो नाही. असेही ते एकदा म्हणाले होते. या विधानांवरुन ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहोत हे दिसून आले आहे. मात्र स्थानिक मीडियाच्या विविध रिपोर्टनुसार, पक्षानं त्यांना कधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा समजलेलं नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन त्यांच्या नावाचा विचार होईल असे वाटत नाही.

पुन्हा शिव 'राज'....

कुणी काहीही म्हटलं तरी शिवराज यांची मध्यप्रदेशातील लोकप्रियता कमी होत नाही. त्यांचे पक्षातील स्थान आणि केंद्रीय मंत्र्यांशी असलेले संबंध पाहता त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल असे बोलले जात आहे. ही त्यांची पाचवी टर्म असून २०२४ च्या लोकसभा निवडणूकांपर्यत शिवराज यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवलं जाईल अशीही एक चर्चा सध्या जोरदार सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT