sadhvi pragya 
देश

बैलांच्या नसबंदींवर प्रज्ञा सिंह ठाकूर संतप्त; लागलीच आदेश मागे

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये बैलांच्या नसबंदीचा आदेश निघाला आणि एकच हलकल्लोळ माजला. हा नसबंदीचा आदेश निघाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मागे घेण्यात आला आहे. कारण या आदेशावरुन इतका गोंधळ झालेला पहायला मिळाला की, राज्य पशुपालन विभागाला हा आदेश मागे घ्यावा लागला आहे. या आदेशाविरोधात सर्वांत आधी पुढे आल्या त्या खुद्द भाजपच्याच खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर...

प्रज्ञा ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय की, बैलांची नसबंदी केली जात होती आणि त्यासंदर्भातील आदेश माझ्या पाहण्यात आला. मी तातडीने त्यावर कारवाई केली आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पशुपालन मंत्री प्रेम सिंह पटेल यांच्याशी यासंदर्भात बातचित केली. त्यानंतर आज हा आदेश मागे घेण्यात आला आहे.

त्यांनी पुढे म्हटलं की, मला असं वाटतं की, कुठे ना कुठे हा आदेश म्हणजे अंतर्गत षड्यंत्र असावं. त्यामुळे याप्रकरणी सावधान राहण्याची आवश्यकता आहे. कारण देशात गोवंशाला कधीच कुणीही नष्ट करु शकत नाही आणि करायलाही नको पाहिजे.

ठाकूर यांनी म्हटलंय की, हे कसं घडलं, हा एका तपासाचा विषय आहे. मी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तपास करण्यासाठी विनंती करणार आहे. हे केंव्हापासून, का आणि कशासाठी होत आहे, याबाबत तपास व्हावा, अशी विनंती मी त्यांना करणार आहे. हा जो देशी गोवंश आहे, त्याच्यासोबत इतका अत्याचार कशासाठी? असा आदेश पुन्हा कधीही निघता कामा नये.

यादरम्यानच, राज्याच्या पशुपालन विभागाने काल बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर बैलांच्या नसबंदी अभियानाला थांबवण्याचा आदेश टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

SCROLL FOR NEXT