Madras High Court allowed PM Modi Coimbatore Road Show 18th March with certain conditions Marathi News  
देश

PM Modi Coimbatore Road Show : तामिळनाडू सरकारला झटका! अखेर हायकोर्टाकडून PM मोदींच्या रोड शोला परवानगी

PM Modi Coimbatore Road Show : तामिळनाडू उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोईम्बतूरमधील रोड शोला मंजूरी दिली आहे.

रोहित कणसे

PM Modi Coimbatore Road Show : तामिळनाडू उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोईम्बतूरमधील रोड शोला मंजूरी दिली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने १८ मार्च रोजी रोड शो करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव कोईम्बतूरमधील रोड शोवर काढण्यास परवानगी नाकारली होती.

या प्रकरणी पोलिसांच्या आदेशाला आव्हान देत भाजपच्या तामिळनाडू युनिटने मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. भाजप आणि राज्य सरकारचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती एन. आनंद व्यंकटेश यांनी आज सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत आदेश देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने भाजपच्या बाजूने निकाल दिला.

यापूर्वी कोईम्बतूर पोलिसांनी येथे रोड शो करण्याची परवानगी देता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. याला प्रामुख्याने 4 कारणे देण्यात आली होती. यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हा रोड शो सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. दुसरे कारण म्हणजे कोईम्बतूर हा संवेदनशील भाग मानला जातो. रोड शो काढल्याने सर्वसामान्यांना त्रास होईल, असेही सांगण्यात आले होते. याशिवाय 18 आणि 19 मार्च ला परीक्षा आहेत, त्या दरम्यान रोड शोमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो असेही कारण देण्यात आले होते.

मद्रास हाय कोर्टाचे न्यायमूर्ती एन आनंद वेंकटेश यांनी कोईम्बतूर पोलीसांना चार किलोमीटरच्या रोड शोला परवानगी देण्याचे निर्देष दिले आहेत. काही अटी घालून ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 18 मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या रोड शोचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

तामिळनाडूच्या भूमीवर आपल्याला मोठा बदल जाणवत असून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी विरोधी आघाडी इंडियाचा सर्व अहंकार मोडून काढेल, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी केला.

कन्याकुमारी येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, जे देश तोडण्याचे स्वप्न पाहतात, जम्मू-काश्मीरच्या जनतेने अशा लोकांना नाकारले आहे. आता तामिळनाडूची जनताही तेच करणार आहे. तामिळनाडूच्या मातीत आमूलाग्र बदल जाणवत आहे. यावेळी तामिळनाडूतील भाजपच्या कामगिरीमुळे द्रमुक आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीचा सर्व अहंकार मोडीत निघेल. गर्दीकडे बोट दाखवत ते म्हणाले की, देशाच्या या दक्षिण टोकावरून उठलेली लाट खूप दूर जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update:'मुळशीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस'; धरण ९९ टक्‍के भरले, आत्तापर्यंत एकुण ७४२८ मिमी पाऊस

Pune Rain Update:'भोर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस'; वरंधा घाटातील महाड हद्दीत दरड कोसळली, वाहतूक बंद

Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' 10 खास गोष्टी, घरात पसरेल आनंदाची लाट

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT