sakal breaking notifiction 
देश

दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

LIVE Update : सुषमा अंधारे यांची नवनीत राणा यांच्यावर टीका

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे अंधारे म्हणाल्या, कास्ट्यूम घालून एक गाणं आमच्या नवनीत अक्कानी केलं आहे. पण, त्यांच्यावर चर्चा झाली नाही. मग, ज्या गाण्यात खान असते म्हणून चर्चा होते का. खान असतो म्हणून त्यावर आक्षेप होतात. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

आज निकाल नाहीच! निवडणूक आयोगाची सुनावणी पुढे ढकलली

आज निकाल नाहीच! निवडणूक आयोगाची सुनावणी पुढे ढकलली आहे. पुढील सुणावणी शुक्रवारी होणार आहे. दोन्ही गटांचा युक्तीवाद जाणून घेतल्यानंतर आयोगाने सुनावणी पुढे ढकलल आहे.

शिंदे गटाची कागदपत्रे खरी असतील तर त्यांची तपासणी करा; ठाकरे गटाचे वकील

शिंदे गटाची कागदपत्रे खरी असतील तर त्यांची तपासणी करा, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल यांनी शिंदे गटाची कागदपत्रे खोटी असल्याचा दावा केला होता.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु केला आहे. ते म्हणाले की सर्वाधिक पदाधिकारी शिंदे गटाकडे आहेत त्यांमुळे लवकर निर्णय द्यावा

जर मोठा गट पक्षातून लोकप्रतिनिधींसह बाहेर पडला तर त्यात बेकायदेशीर काय असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकीलांनी केला.

आताची मोठी बातमी, चिन्हावर आज निकाल येण्याची शक्यता कमी

सुप्रीम कोर्टाच्या निर्णय आल्या शिवाय पक्ष चिन्हाचा निर्णय घेऊ नका, शिंदे गटाच्या कागदपत्रे बोगस असल्याचा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.

शिंदे गटाची कागदपत्रे बोगस; सिब्बल

शिंदे गटाची कागदपत्रे बोगस असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाच्या वकीलाकडून करण्यात आला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे आणि ठाकरे गटाचे एकूण 25 वकील दाखल

शिंदे गटाकडून महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांची टीम निवडणूक आयोगात दाखल.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरू केली आहे. आणि आयोगा समोर कपिल सिब्बल यांच्याकडून कागदपत्रे ठेवण्यात आले.

धनुष्यबाण आणि शिवसेना कोणाची? सुनावणी सुरू

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण आणि शिवसेना कोणाची यावर सुनावणी सुरु झाली आहे. या सुनावणीदरम्यान  कपिल सिब्बल, देवदत्त कामत आणि सनी जैन हे ठाकरे गटाच्या बाजूने युक्तीवाद करतील. तर महेश जेठमलानी, मनिंदर सिंह हे शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत.

शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा, निवडणूक आयोगाची सुनावणी, वाचा एका क्लिकवर

नेमकी शिवसेना कोणाची? या प्रश्नावरती गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हं गोठवलं. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळी नावे आणि चिन्हे दिली. यावर सुप्रीम कोर्टात आणि आयोगासमोर यावर वाद सुरूच आहे. त्यानंतर शिवसेना पक्षावर कोणत्या गटाचा अधिकार राहील, या मुद्यावर सुरू असलेली सुनावणी आज पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होत आहे.

शाहरुख खानच्या ‘पठाण’बाबत दिल्ली हायकोर्टाचे आदेश; चित्रपटात करावे लागणार बदल

गेल्या आठवड्यात शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता दिल्ली हायकोर्टाने यशराज फिल्म्स प्रॉडक्शनला त्यात काही बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने प्रॉडक्शन कंपनीला त्यात सबटायटल, क्जोज कॅप्शनिंग आणि हिंदीत ऑडिओ डिस्क्रिप्शन द्यायला सांगितले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर श्रवण आणि दृष्टिबाधित लोकांना चित्रपटाचा आनंद घेता येईल, यासाठी हे बदल सुचवण्यात आले आहेत.

लातुरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात

या अपघातात ४२ जण जखमी झाल्याची माहितीप्राथमिक माहिती समोर आली असून जखमींवर लातुरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पक्षांतर्गत निवडणुकीच्या परवानगीसाठी ठाकरे गट विनंती करणार 

पक्षांतर्गत निवडणुकीच्या परवानगीसाठी ठाकरे गट विनंती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी 4 वाजता या संबधी सुनावणी पार पडणार आहे. आज कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत ठाकरे शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत.

26/11 हल्याचा मास्टरमाईंड अब्दुल मक्की अखेर दहशतवादी म्हणून घोषित

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) सोमवारी पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्कर-ए-तैयबाचा (LeT) प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की याला ISIL अंतर्गत अखेर जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ; हॉल तिकीट मिळालेच नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यानचा गोंधळ निर्माण झाला आहे. दहा वाजता पेपर असून देखील विद्यार्थ्यांना वेळेत हॉल तिकीट न मिळाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे विना हॉल तिकीटच परीक्षा सुरु करण्यात आली. हॉल तिकीट न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

92 नगरपरिषदांमध्ये सुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का?  महानगरपालिका मधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. 

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? आज निवडणूक आयोगात सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याची निर्णय मात्र त्या आधीच होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर आज सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता त्यावर काय निर्णय होतो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT