Live Update
Live Update Esakal
देश

Prakash Ambedkar : ''मी मोदी अन् अमित शहा यांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही''

सकाळ डिजिटल टीम

''मी मोदी आणि अमित शहा यांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही''

२०२४ मध्ये बिना भाजप आणि rss चे सरकार येऊ द्या, मी मोदी आणि अमित शहा यांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही असं विधान वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. झुकाने वाला चाहीये, सरकार उसके सामने झुकती है आणि २०२४ मध्ये यांना झुकवा हेच आव्हान मी करतो असं ते यावेळी म्हणाले आहेत.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग

विजयवाडामधील गन्नावरम एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. टेक-ऑफनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे लँडिंगचा इमर्जन्सी निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी दिल्लीला जात होते.

पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सरासरी 52 ते 53 टक्के मतदान

अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सरासरी 52 ते 53 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. अंतिम टक्केवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

''एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारं मुख्य नेतेपद हे घटनात्मक नाही''

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी उत्तर सादर करण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून ईमेलद्वारे आपलं लेखी म्हणणं मांडण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारं मुख्य नेतेपद हे घटनात्मक नाही, असा मुद्दा ठाकरे गटाने आपल्या लेखी उत्तरात मांडला आहे. तर एकनाथ शिंदे यांना शिवसेनेची घटना यापूर्वी मान्य होती. पण आताच नेमकं काय झालं? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची वेळ संपली 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची वेळ संपली आहे. 2 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

दोन्ही गटाला निवडणूक आयोगात लेखी उत्तर सादर करण्यासाठी अर्धा तास शिल्लक

दोन्ही गटाला निवडणूक आयोगात लेखी उत्तर सादर करण्यासाठी अर्धा तास शिल्लक राहिला आहे. निवडणूक आयोगाकडून ठाकरे आणि शिंदे गटाला 5 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी उत्तर सादर

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी उत्तर सादर करण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून ईमेलद्वारे आपलं लेखी म्हणणं मांडण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथाचा देशात दूसरा क्रमांक 

महाराष्ट्राच्या चित्ररथाचा देशात दूसरा क्रमांक आला आहे तर उत्तराखंडच्या चित्ररथाचा पहिला क्रमांक आला आहे.

पाकिस्तानात मशिदीमध्ये बॉम्बस्फोट; आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू

पाकिस्तानात मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 90 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

शिंदे गटाच्या आमदाराला दादर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं

गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबई मधील प्रभादेवी इथे झालेल्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार राडा झाला होता यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला होता या प्रकरणी सदा सरवणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. सदा सरवणकर यांची दादर पोलीस ठाण्यात चौकशी होणार आहे. 

  राहूल गांधींची श्रीनगर येथे जोरदार बर्फवृष्टीत सभा

राहुल गांधी यांनी जम्मू काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे जोरदार बर्फवृष्टीत सभा घेतली. यावेळी त्यांनी आर्मी जवान आणि काश्मिरच्या जनतेचे आभार मानले.

एकनाथ शिंदे यांच्या शासकीय विमानात पुन्हा बिगाड

एकनाथ शिंदे यांच्या शासकीय विमानात पुन्हा एकदा बिगाड झाला आहे. एकनाथ शिंदे जळगावच्या एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी निघाले असता ते चालू न झाल्याने ते जागेवरच थांबून आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून जामनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण सुद्धा घेतले. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने (Air Pressure) विमानाला परत माघारी यावे लागले.

साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

 साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ आज पहाटे ५.३० दरम्यान कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू असून, सहा जण जखमी झाले आहेत.

पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दुभाजक तोडून कार पलटी, CCTV Footage Viral

बीबीसीच्या माहितीपटावर बंदी प्रकरणी 

2002 च्या गुजरात दंगलीवर बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने 6 फेब्रुवारीला जनहित याचिका दाखल करण्यास सहमती दर्शवली. अधिवक्ता एमएल शर्मा यांनी मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर लवकर सुनावणीसाठी या प्रकरणाचा उल्लेख केला.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 2 फेब्रुवारीला

या मुंबई महापालिकाचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प 2 फेब्रुवारी रोजी  सादर होणार आहे. यावर्षी देखील महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासकच मांडणार आहे.

मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान खात्याचा अंदाज

 गेल्या काही दिवसांत राज्यातील ठिक ठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. त्यातच आता हवामान खात्याने राज्यात मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाचे सावट आहे.

शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाचा आज फैसला होणार?

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान ठाकरे गट व शिंदे गट लेखी म्हणणं मांडणार आहे. त्यामुळे आज पार पडणाऱ्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीत निर्णय जाहीर होणार की राखून ठेवला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती या पदवीधर तसंच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे.

सविस्तर बातमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT