Mamata Banerjee on Maharashtra Political Crisis sakal
देश

महाराष्ट्राच्या राजकीय गोंधळात ममता बॅनर्जींची उडी; BJPवर गंभीर आरोप

उद्या शिंदे गट बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणार असून ठाकरे सरकारचं भवितव्य ठरणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळाकडे देशभराचं लक्ष लागलेलं आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी भाजपा कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Mamata Banerjee on Maharashtra Political Crisis)

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या की, महाराष्ट्रातलं सरकार (Mahavikas Aghadi government) पाडण्यासाठी भाजपा कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. राज्यातलं निवडून आलेलं सरकार पाडण्यासाठी एवढे पैसे त्यांच्याकडे कुठून येतायत? आपल्या देशातली लोकशाही कोणत्या दिशेने चाललीये. संसदीय संरचनेचं काय? भाजपाने सगळ्यावरच बुलडोझर चालवण्याचं ठरवलंय का?

राज्यातलं महाविकास आघाडीच्या सरकारला धक्का लागला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (Shivsena) आमदारांनी केलेल्या बंडामुळे हा धक्का बसला आहे. काल रात्री उशिरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor BhagatSingh Koshyari) यांना भेटून बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली. त्यानुसार आज सकाळीच उद्धव ठाकरे आणि विधानभवनाला बहुमत सिद्ध कऱण्यासाठीचं पत्र देण्यात आलं. तर तिकडे एकनाथ शिंदे गट गुवाहाटीतून मुंबईत बहुमत सिद्ध करण्यासाठी येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भयानक सत्य उघड! प्राणी, वृद्ध महिला आणि स्वतःच्या मुलीलाही सोडलं नाही... नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या विकृत कृत्यांचा इतिहास समोर

Thane: ठाण्यात पाणीकपात लागू, पाणीपुरवठा महिन्यातून दोनवेळा बंद, कुठे आणि कधी?

टोळक्यानं भररस्त्यात गाठलं; काठी, कोयता आणि दगडाने तब्बल ३५ वार, सोलापुरात तरुणाला क्रूरपणे संपवलं, भयंकर कारण समोर

Latest Marathi News Live Update : समता पतसंस्थेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

Kabaddi: भारतीय नौदलाचा 'बंड्या मारुती' चषकावर कब्जा! भरत हुडा ठरला १ लाखाचा मानकरी; फायनलमध्ये यु.पी. योद्धाचा धुव्वा

SCROLL FOR NEXT