Maharashtra Pradesh Youth Congress Service Week on the occasion of Rahul Gandhis birthday 
देश

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा 'सेवा सप्ताह'

सकाळवृत्तसेवा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 ते 25 जून  'सेवा सप्ताह' आयोजित  करणार आहे. या सप्ताहअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रदेशअध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गरजूंना 'न्याय किट' चे वाटप
लॉकडाऊन जरी अंशतः खुलला असला तरी रोजगार अद्याप पूर्णपणे सुरू झाला नसल्याने गरिबांची आणि विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाची उपासमार होत आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेत गरजूंसाठी अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या 'न्याय किट' चे वाटप करण्याचा कार्यक्रम युवक काँग्रेसने हाती घेतला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याअंतर्गत ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रयेक प्रौढ व्यक्ती वर्षभरात कमीत कमी ५० दिवसांचे काम मिळविण्यास पात्र आहे. सोबतच, लॉकडाऊन काळामध्ये केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत अजून जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

युवक काँग्रेस मनरेगा अंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा घेऊन कामगारांच्या काही समस्या असल्यास  सोडवणार आहे. सोबतच नवीन कामगारांना जॉब कार्ड मिळवून देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यात येणार आहे.


घरात लग्नाची तयारी सुरू असताना आलं वीरमरण...
 
कोरोना योद्द्यांचा सत्कार
कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग, पोलिसखाते आणि पालिकेचे विविध विभागाचे कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेचे कोरोनापासून रक्षण केले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युवक काँग्रेस राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यामध्ये कोरोना योद्द्यांचा सत्कार युवक काँग्रेस करणार आहे.

'जवानांना सीमेवर निःशस्त्र का पाठवले? जबाबदार कोण?'
वरील तिन्ही कार्यक्रम हे 19 ते 25 जूनदरम्यान सेवा सप्ताहाअंतर्गत राबविण्यात येणार असून  गावातील प्रत्येक वार्डात शहरातील प्रत्येक  वार्डात याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT