Mahatma Gandhi esakal
देश

Mahatma Gandhi Jayanti : भारतीय चलनाच्या नोटेवर गांधीजींचा फोटो कधी आला?

नोटेवर असलेला गांधीजींचा फोटो कधीचा आहे

सकाळ डिजिटल टीम

Mahatma Gandhi Jayanti : भारत स्वतंत्र्य झाला तेव्हापासून भारताचं स्वत:च चलन अस्तित्वात आले. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिली नोट छापण्यात आलेली ती १ रूपयाची नोट होती.पण, तेव्हा भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो नव्हता. त्याऐवजी एका ब्रिटीश अधिराऱ्याचा फोटो छापण्यात आला होता.

पण त्यानंतर अनेक वर्षांनंतर , राष्ट्रपिता या नात्याने भारतीय नोटांवरील ब्रिटीश राजाचा म्हणजेच जॉर्ज 6 फोटो हटवून गांधीजींचा फोटो असावा अशी मागणी होती. पण तसं सुरूवातीला तर झालं नाही. स्वातंत्र्यानंतर 1949 पासून भारतीय नोटांवर ब्रिटीश राजाला हटवून अशोक स्तंभ छापण्यात आला.   

त्यावेळी ब्रिटनच्या महाराजांऐवजी महात्मा गांधींचे चित्र छापण्यात यावे, असे मान्य करण्यात आले होते, परंतु नंतर नोटांवर अशोक स्तंभाचे चित्र छापले जाईल, असे ठरले. 1950 मध्ये पहिल्यांदा 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. या सर्व नोटांवर अशोक स्तंभाचे फोटो छापण्यात आले होते.

1953 मध्ये नोटांवर हिंदी ठळकपणे छापण्यात आली होती. त्यानंतर 1954 मध्ये एक हजार, दोन हजार आणि 10 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आल्या, मात्र 1978 मध्ये त्या नोटाबंदी करण्यात आल्या, म्हणजेच चलनातून काढून टाकण्यात आल्या.

1996 मध्ये, रिझर्व्ह बँकेने अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह 'महात्मा गांधी सीरीज'च्या नवीन चलनी नोटा जारी केल्या. वॉटरमार्कही बदलले. असे वैशिष्ट्य देखील त्यात जोडण्यात आले आहे, जेणेकरून अंध व्यक्तींनाही नोट सहज ओळखता येईल. 9 ऑक्टोबर 2000 रोजी RBI ने 1000 रुपयांची नोट जारी केली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी झाली. महात्मा गांधी मालिकेतील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. यानंतर 2 हजार रुपयांची नोट जारी करण्यात आली. त्यातही गांधीजींचा फोटो छापण्यात आला होता.

गांधीजींच्या आधी नोटांवर कोणाचा फोटो होता?

महात्मा गांधींचा 1 रुपयांच्या नोटेवर तेलाची विहीर, 2 रुपयांच्या नोटेवर आर्यभट्टाची उपग्रह प्रतिमा, 5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरने शेत नांगरणारा शेतकरी आणि 10 रुपयांच्या नोटेवर कोणार्क मंदिराचे चाक, मोर आणि शालिमार बाग छापण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेने 500 रुपयांची नोट जारी केली. त्यावर महात्मा गांधींचे चित्र छापण्यात आले होते. अशोक स्तंभाला वॉटरमार्क लावण्यात आले.

गांधीजींचा तो फोटो कोणी काढला ?

नोटेवर असलेला तो फोटो 1946 मध्ये काढण्यात आला होता. महात्मा गांधी लॉर्ड फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स व्हिक्टरी हाऊसमध्ये आले तेव्हा तो फोटो घेण्यात आला होता. ब्रिटीश राजनीतीतज्ञ फ्रेडरिक पेथिक लॉरेंस यांच्यासोबत झालेल्या भेटीचा तो फोटो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT