mahatma gandhi 
देश

Gandhi Jayanti 2020: महिलांवरील अत्याचारावर काय म्हणाले होते गांधी?

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशातील महिलांवरील वाढते अत्याचार सध्याचा चिंतेचा विषय बनला आहे. उत्तरप्रदेशातील हाथरसचे प्रकरण सध्या माध्यमांत मोठं चर्चेत आहे. देशभर या अत्याचाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती. जर महात्मा गांधी आज असते तर त्यांनी यावर काय सांगितलं असतं याचा विचार केला पाहीजे. कारण महिलांवरील अत्याचाराबद्दल गांधीचे स्पष्ट मत होते. त्यांनी एका पत्रात स्त्रियांनी स्वसंरक्षणासाठी जे करता येईल ते करण्याचा सल्ला दिला आहे. गांधीजीचे मत होते की, बलात्कार झालेल्या स्त्रीचा कधीच तिरस्कार कर नये. गांधीजींनी त्यांच्या मुलांनाही स्त्रींयांशी संमजसपणे वागायला शिकवले होते. मुलांना लिहिलेल्या पत्रांमध्ये सभ्यतेचे उल्लंघन होऊ नये अशी कोणतीही कृती न करण्याची स्पष्ट ताकीद केली होती.

सीता आणि रावणाचं उदाहरण-
महिलांसोबतचे गैरवर्तन आणि त्यांचावरील अत्याचाराबद्दल गांधीजींचे विचार 'द माइंड ऑफ महात्‍मा गांधी' या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. जर महिला अत्याचार करणाऱ्याचा शाररिक ताकदीचा सामना करू शकत नसली तरी पवित्रता महिलांची सर्वात मोठी ताकद असते. यासाठी गांधीजींनी रावणाचं उदाहरण दिले आहे. शारीरिकदृष्ट्या सीता रावणासमोर खूपच कमजोर होती, पण तिची पवित्रता रावणाच्या ताकदीपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. रावणाने सीतेला मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पण त्याला त्यात यश आलं नव्हतं. गांधीच्या मते, एका निडर महिलेला माहित असते की तिची पवित्रताच तिच्यासाठी ढाल असते. एखादा पुरुष कितीही वासनांध असला तरी स्त्रीच्या पवित्रतेमुळे त्याला स्वतःची लाज वाटते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वसंरक्षण स्त्रीचा अंतिम धर्म-
ज्यावेळी एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेत तर तिने हल्ल्याच्या वेळी हिंसा आणि अहिंसेचा विचार करू नये. त्या वेळी स्वसंरक्षण करणे हा स्त्रीचा अंतिम धर्म आहे. त्या वेळी आपल्या प्रतिष्ठेचे आणि शरीराचे रक्षण करण्यासाठी मिळेल त्या साधनांचा वापर करुन प्रतिकार केला पाहिजे. यावेळेस तिने नखे, दात आणि जे बळ असेल त्याचा उपयोग केला पाहीजे. मरण्याची सगळी भीती सोडून दिलेली स्त्री किंवा पुरुष केवळ स्वत:चे संरक्षण करू शकणार नाही, तर स्वतःच्या प्राणाची बाजी लाऊन इतरांचेही संरक्षण ही करू शकेल.

मुलांना लिहिलेल्या पत्रांमध्ये महात्मा गांधींनी नेहमी स्त्रियांचा आदर करायला सांगत. महात्मा गांधींनी त्यांच्या मुलांना पत्नीबरोबरही जबरदस्ती करू नये असं बजावलं आहे. जर पत्नीची इच्छा असेल तरच शाररिक संबंध ठेवले पाहीजेत असंही त्यांनी सांगितलं आहे. पत्नीची चांगला मित्र बना तसेच तिचा गुलाम बननेही टाळा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return Video : हॅलो वर्ल्ड! अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतरचा पहिला व्हिडिओ व्हायरल..

Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाला मोठं वळण! आरोपीबाबत बाल न्याय मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

Raigad News: मुसळधार पावसाची ठिकाणं प्रशासनाकडून दुर्लक्षित, विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर सुट्टीचे आदेश जारी; पालक संतप्त

Shubhanshu Shukla: आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, पंतप्रधानांना अभिमान...; शुभांशू शुक्ला पृथ्वीवर उतरताच प्रतिक्रिया काय होती?

Sangli Researcher : संशोधक घडत नसतो, घडवावा लागतो, सांगलीतील चहावाल्याचं पोरगं बनतंय टेक्नोलॉजी मास्टर; ड्रंक अँड ड्राईव्हला बसणार चाप

SCROLL FOR NEXT