भारतीय हवाई दलात (IAF) आणखी १० राफेल (Rafale) लढाऊ विमानं येत्या महिन्याभरात दाखल होणार आहेत. यामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. यांपैकी तीन विमानं येत्या दोन-तीन दिवसांतच भारतात दाखल होणार आहेत. तर इतर ७ ते ८ लढाऊ विमानं एप्रिलच्या मध्यापर्यंत आणि त्यांचे ट्रेनर व्हर्जन एप्रिल अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. या १० विमानांमुळे भारतातील राफेल विमानांची एकूण संख्या २१ होईल.
बांगलादेश दौऱ्यातील पंतप्रधान मोदींच्या हस्ताक्षराची चर्चा; सोशल मीडियावर धुमाकूळ
देशात सध्या ११ राफेल विमानं असून ते अंबाला एअरबेसवर (Ambala Airbase) तैनात आहेत. एका टॉपच्या सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, तीन राफेल लढाऊ विमानं पुढील दोन ते तीन दिवसात भारतात पोहोचत आहेत. ही विमानं थेट फ्रान्सवरुन (France) उड्डाण करणार असून एका मित्र देशाच्या मदतीनं हवेतच इंधन भरत भारतात पोहोचतील. यानंतर आपल्याला पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत ७ ते ८ लढाऊ विमानं आणि त्यानंतर त्याचे ट्रेनर व्हर्जन मिळतील.
३६ राफेल विमानांची झाली डील
भारतीय हवाई दलात राफेल दाखल होण्यास गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये सुरुवात झाली. इथे पोहोचल्यानंतर फारच कमी वेळेमध्येच या विमानांनी आपलं कामही सुरु केलं. राफेल लढाऊ विमानांना पूर्व लडाखमध्ये चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गस्तीसाठी देखील तैनात करण्यात आलं होतं. भारताने सप्टेंबर २०१६ मध्ये फ्रान्सकडून ३६ लढाऊ विमानांसाठी डील केली होती.
मिनरल वॉटरच्या नावाने साधं पाणी विकणाऱ्यांना बसणार चाप
फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानांची जी नवी खेप येणार आहे. यांपैकी काही विमानं ही अंबाला एअर बेसवर तैनात असतील तर इतर विमानं ही हाशिमारा येथे पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान, राफेल विमानांचं दुसरं स्क्वाड्रन तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.