Congress President Election 2022 esakal
देश

Congress : अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट? 'या' दोन दिग्गज नेत्यांत 'कांटे की टक्कर'

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतची परिस्थिती आता स्पष्ट होताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतची परिस्थिती आता स्पष्ट होताना दिसत आहे.

Congress President Election 2022 : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतची परिस्थिती आता स्पष्ट होताना दिसत आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आणि झारखंड काँग्रेसचे नेते केएन त्रिपाठी (KN Tripathi) यांनी पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळं काँग्रेसच्या सर्वोच्च पदासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. थरूर यांनी आज दुपारी एआयसीसी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर ते म्हणाले, मी खर्गे साहेबांचा खूप आदर करतो. अनेकांनी अर्ज भरले ही चांगली गोष्ट असून लोकांनाही पर्याय मिळणार आहे. मी कोणाचाही अपमान करण्यासाठी हा अर्ज भरलेला नाही. आपण एकत्र काम करणं आवश्यक आहे. खर्गे आमच्या पक्षाचे भीष्म पितामह आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तिरंगी लढत होण्याची शक्यता

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (शुक्रवार) पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीच्या समर्थनामध्ये पक्षाचे नेते अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, प्रमोद तिवारी, पीएल पुनिया, एके अँटनी, पवनकुमार बन्सल आणि मुकुल वासनिक यांचा समावेश होता. G23 गट नेते आनंद शर्मा आणि मनीष तिवारी यांनी काँग्रेसमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला होता. ते देखील खर्गे यांच्या नामांकनाच्या समर्थनामध्ये आहेत.

दिग्विजय सिंह यांची निवडणुकीतून माघार

झारखंड काँग्रेसचे नेते केएन त्रिपाठी यांनीही पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर केला जाईल, असं सांगितलं. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आज पक्षप्रमुखपदाच्या निवडणुकीतून माघार घेतलीय. पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसून, त्यांचे सहकारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीमध्ये ते प्रस्तावक असतील, असं त्यांनी सांगितलं.

17 ऑक्टोबरला होणार मतदान

नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयाच्या आवारात एक तंबू उभारण्यात आला असून तिथं पक्षाचे नेते दुपारी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT